खडकवासला: दीड लाख लोकसंख्येच्या धायरीत अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या डीपी रस्त्यांचा आराखडा, कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना धायरीकरांनी जागोजागी आकर्षक होर्डिंग लावून साकडे घातले आहे.
भल्या पहाटेपासून उपमुख्यमंत्री विकास कामांना भेटी देतात. याचा संदर्भ देत त्यांचे लक्ष वेधण्यासाठी अजित पवार यांच्या फोटोसह धायरीतील मुख्य रस्त्यावर होर्डिंग उभे केली आहेत. ‘दादा, पहाटेचा एक दौरा धायरीच्या डीपी रस्त्याला पण होऊन जाऊ द्या की. दादा, तुम्ही आल्याशिवाय धायरीचा डीपी रस्ता होणार नाही, अशा आशयाचा मजकूर होर्डिंग्जवर लिहिण्यात आला आहे. (Latest Pune News)
धायरी परिसरातील वाहतूक कोंडी अपुर्या रस्त्यांची अवस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे डीपी रोडचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.