Pune Ganeshotsav 2023 : एका क्लिकवर कळणार गणेशभक्तांना फिरत्या हौदांचे लोकेशन

Pune Ganeshotsav 2023 : एका क्लिकवर कळणार गणेशभक्तांना फिरत्या हौदांचे लोकेशन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आणि विसर्जनासाठी तयारी पूर्ण केली असून, विसर्जनासाठी व्यवस्था केलेल्या फिरत्या हौदांचे लोकेशन (ठिकाण) पाहण्याची सोय करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्वीपिंग, कंटेनर, निर्माल्यकलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमन दल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदीकिनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागांत नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे.

तसेच जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युतव्यवस्था, ध्वनिवर्धक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्यांच्या गळतीच्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती कामे करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनिवर्धकाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सूचनाफलक आदी तयारीही करण्यात आली आहे.

या लिंकवर करा क्लिक…

गणेशभक्तांना आपल्या घराजवळ विसर्जनाची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 10 या प्रमाणे 150 फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था केली आहे. हे हौद कुठे असतील, याचे लाइव्ह लोकेशन गणेशभक्तांना http://35.165.18.115/livevisarjan.aspx या लिंकवर पाहता येणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news