Galmukt Dharan Abhiyan Pune: गाळमुक्त धरण अभियानाला वेग; शेतकऱ्यांना मोफत गाळ

‌‘खडकवासला‌’ मॉडेलच्या यशातून राज्यात ‌’नवीन जलक्रांती‌’ची दिशा
Galmukt Dharan Abhiyan Pune
Galmukt Dharan Abhiyan PunePudhari
Published on
Updated on

वेल्हे: राज्य शासनाच्या ‌‘गाळमुक्त धरण‌’ अभियानामुळे सिंहगड, पानशेत, वरसगाव तसेच राजगड, हवेली आणि मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीत टाकण्यासाठी मोफत गाळ व लाल माती उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमामुळे शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे.

जलसंपदा व जलसंधारण विभाग, नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त पुढाकारातून धरणांतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यासाठी 22 जेसीबी, पोकलॅन यंत्रे तसेच 44 ट्रॅक्टर-डंपरचा वापर केला जात आहे.

Galmukt Dharan Abhiyan Pune
Jaggery Adulteration: भेसळयुक्त गुळामुळे आरोग्य धोक्यात; ‌’सेंद्रिय‌’ नावाखाली ग्राहकांची फसवणूक

काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत असून धरण तीरावर वृक्षलागवड आणि शेतरस्ते विकसित करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती नाम फाउंडेशनचे सहाय्यक नीलेश जावळकर यांनी दिली.

सध्या पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणांसह मुळशी तालुक्यातील रिहे तलाव, पिंपोळी-खांबोली, आंधळे तलाव तसेच हवेलीतील ओढे व बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आमदार भीमराव तापकीर आणि आमदार शंकर मांडेकर यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Galmukt Dharan Abhiyan Pune
Beetroot Crop Loss: उष्णतेचा बीट पिकावर परिणाम; उत्पादनात घट

या उपक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद जावळकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग््रेासचे कार्याध्यक्ष धनराज जोरी, हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, शिरकोली अमोल पडवळ, कादवेचे विनोद बिरामणे, आंबीचे सरपंच पोपटराव निवंगुणे, तानाजी थोपटे, सुशांत खिरीड, अण्णा दिघे, अविनाश पायगुडे, तानाजी पवळे, रवींद्र हाडके, अनिल शिंदे, दत्तात्रय पवळे, केतन जावळकर, अनिल जावळकर आदी उपस्थित होते.

...म्हणून अभियानाला चालना

ग््राीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांच्या पुढाकारातून खडकवासला धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. लोकसहभागातून काढलेला गाळ शेतजमिनीत वापरल्याने सुपीकता वाढली. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून धरणाची पाणी साठवण क्षमता सुधारली आहे. या यशस्वी मॉडेलमुळे राज्यभर गाळमुक्त धरण अभियानाला चालना मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news