Pune Firing Case: फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या दुकानावर गोळीबार; मंतरवाडी फाट्यावर खळबळ

पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी फाटा येथे स्टील व्यावसायिकाच्या दुकानाच्या गेटवर अज्ञातांनी गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 3 ते 4 राऊंड फायर करून पलायन केले
Pune Firing Case
Pune Firing CasePudhari
Published on
Updated on

पुणे: फुरसुंगी येथील मंतरवाडी फाटा परिसरातील एका स्टील व्यावसायिकाच्या दुकानाच्या गेटवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.22) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Pune Firing Case
Maharashtra Rain Deficit: राज्यात भीषण पावसाची तूट; 27 जिल्ह्यांत अत्यल्प पाऊस, 210 तालुके ‘रेड झोन’मध्ये

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी संबंधित स्टील व्यावसायिकाच्या दुकानासमोर येत दुकानाच्या गेटवर तीन ते चार राऊंड फायर केले. त्यानंतर गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Pune Firing Case
Mission Lakshyavedh: ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना सुरू; महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकांचा मोठा ध्यास

गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्यावसायिकाला धमकी देण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणण्यात आला की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Pune Firing Case
Pune Burglary Case: धनकवडीत भरदिवसा तीन घरफोड्या; जीपीएसमुळे चोरीची ईव्ही आणि मुद्देमालही सापडला

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, वर्दळीच्या भागात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Pune Firing Case
Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय फसल्याचा आरोप

शुभम लोणकर हा मुख्य आरोपी आहे. आमदार बाबा सिद्दिकी खून प्रकरणातील मुख्य आरोपी. अकोला पोलिसांनी त्याला पकडून पाच पिस्तुले जप्त केली होती. त्याने वारजे परिसरातील पोरं वापरली होती. तसेच सलमान खान प्रकरणात देखील तो आरोपी आहे. शुभम लोणकर सैन्य भरतीसाठी राजस्थानला गेला होता तेव्हा त्याची बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता. तो कॅनडाला फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभम लोणकर हा पुण्यातील बिश्नोई टोळी चालवत असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news