Mission Lakshyavedh: ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना सुरू; महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकांचा मोठा ध्यास

महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना सुरू केली असून ऑलिम्पिक पदकांची संख्या वाढवण्यासाठी खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सुविधा आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे
Mission Lakshyavedh
Mission LakshyavedhPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये, विशेषतः ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग वाढावा आणि राज्याला जास्तीत जास्त पदके मिळावीत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने 'मिशन लक्ष्यवेध' ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. त्याचबरोबर जिल्‍हा पातळीवर 'खेलो इंडिया'सारखी योजनाही सुरू करण्याच्या प्रयत्‍नात असून, ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र सज्ज होत आहे.

Mission Lakshyavedh
Pune Burglary Case: धनकवडीत भरदिवसा तीन घरफोड्या; जीपीएसमुळे चोरीची ईव्ही आणि मुद्देमालही सापडला

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत खेळांचे 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' असे वर्गीकरण करण्यात आले आहे. 'अ' वर्गातील १२ प्रमुख क्रीडा प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, नेमबाजी, धनुर्विद्या आदि खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Mission Lakshyavedh
Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय फसल्याचा आरोप

या केंद्रांतर्गत खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडावैद्यक शास्त्र सुविधा, आधुनिक क्रीडा साहित्य, पोषक आहार आणि परदेशी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय, खेळाडूंची वैयक्तिक माहिती आणि कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी 'स्पोर्ट् स डेटाबेस' तयार केला जात आहे, ज्यामुळे पारदर्शक निवड प्रक्रिया शक्य होईल.

Mission Lakshyavedh
Kedgaon Death: केडगावमध्ये विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात तुटलेल्या तारेला स्पर्श

शासनाने या मिशनसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी केल्या आहेत. प्राथमिक टप्प्यात सुमारे १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी खेळाडूंच्या प्रशिक्षणावर, शिष्यवृत्तीवर आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर खर्च केला जाणार आहे. नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे सुसज्ज क्रीडा वैद्यकीय प्रयोगशाळा उभारण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Mission Lakshyavedh
Pune Cyber Fraud Fake Kidnapping Case: बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा; सायबर चोरट्यांकडून वडिलांची फसवणूक, १७ तासांत मुलगी सुरक्षित

...या आहेत पर्यायी योजना सुरू

  • हाय परफॉर्मन्स सेंटर्स : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुमारे २४० खेळाडूंसाठी सहा ठिकाणी राज्यस्तरीय केंद्रे.

  • स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर्स : राष्ट्रीय स्तरावरील ७४० खेळाडूंसाठी ३७ विभागीय केंद्रे.

  • जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रे : जिल्हा स्तरावर २,७६० खेळाडूंना प्रशिक्षणाची सोय.

इतर उपक्रम

मिशन लक्ष्यवेधसोबतच, 'क्रीडा प्रबोधिनी'च्या माध्यमातून राज्यभरात ८ केंद्रांवर सुमारे ५०० खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, खेळाडूंना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण आणि शिक्षणात सवलती देऊन त्यांना भविष्याची सुरक्षित हमी दिली जात आहे.

राज्यातून ऑलिम्‍पिकपटू घडविण्याच्या दृष्टीने शासनाने मिशन लक्ष्यवेध ही योजना आणली असून, त्‍याची कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे. उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांबरोबरच चांगले प्रशिक्षकही उपलब्‍ध करून दिले जात आहे. आगामी काही वर्षांत राज्यातून उत्तम ऑलिम्‍पिकपटू खेळाडू नक्‍कीच निर्माण होतील.

सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news