पुणे : रियल डेअरीच्या फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा

पुणे : रियल डेअरीच्या फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : दूधाची क्वालिटी चांगली असल्याचे बनावट रेकाॅर्ड तयार करत, ते खरे असल्याचे भासवत येथील एमआयडीसीतील रियल डेअरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुमारे ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमुख मनोज कुंडलिक तुपे (रा. विद्या प्रतिष्ठान शाळेजवळ, ग्रीन पार्क, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार राहूल संभाजी शेडगे, अभिजित बाळू कदम, हनुमंत म्हस्कू जांबळे व दिपक शिंदे (पत्ते नाहीत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. १ मार्च ते १३ जून २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार कंपनीम्ये काम करणाऱ्या शेडगे, कदम यांनी जांबले व त्यांच्या टॅंकरवरील चालक दीपक शिंदे यांच्याशी संगनमत करत कमी क्वालिटीचे दूध असताना त्याची क्वालिटी चांगली असल्याचे बनावट रेकाॅर्ड तयार करत कंपनीची सुमारे ८६ लाख ९३ हजारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news