

LNDA Female Cadets first batch Graduation Ceremony
मुलांच्या बरोबरीने मुलींनीही घेतले तीन वर्षे खडतर प्रशिक्षण
मुलगी अधिकारी झाल्याचे पाहुन आई-वडीलांचे डोळे पाणावले
गुरुवारी झाला 148 वा पदवीप्रदान सामारंभ
उद्या होणार ऐतिहासिक पासिंग आऊट परेड
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी (एनडीए) संस्थेने गुरुवारी आगळा वेगळा इतिहास रचला. संस्थेच्या स्थापने पासून पंचाहात्तर वर्षात प्रथमच मुलींना सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी देण्यात आली त्या संधीचे सोने करीत तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशाच्या विविध प्रांतातून आलेल्या 17 मुलींना पदवी प्रदान करण्यात आली.आता त्या लष्कर,नौदल आणि हवाईदलात थेट अधिकारी पदावर नियुक्त होणार आहेत.आपल्या मुलींचे कौतुक पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून त्यांचे आई-वडील आले होते.
एनडीएची स्थापना पुण्यातील खडकवासला भागात 8 जून 1949 रोजी सुमारे 75 वर्षापूर्वी झाली.कारण एकाच ठिकाणी लष्कर,नौदल आणि हवाईदलाचे अधिकारी तयार करता यावेत हा उद्देश होता.मात्र या संस्थेच 2021 पर्यंत मुलींना प्रवेश नव्हता.कारण तशी तरतूद नव्हती.मात्र सरकारने 2022 मध्ये मुलींना येथे प्रवेश दिला.त्या पहिल्या तुकडीत देशभरातून 17 मुलींची निवड झाली.त्याचे कौतुक कऱण्यासाठी त्या वर्षी राष्ट्रपती दौपदी मुर्मू आल्या होत्या.त्या सर्वमुली तीन वर्षांचे खडतर परिश्रम पूर्ण करीत आज देशाच्या सैन्यदलात अधिकारी पदावर रुज होण्यास सज्ज झाल्या.
या पदवीप्रदान सोहळ्यासाठी दिनदयाल उपाध्याय, गोरखपर विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ.पूनम टंडन आल्या होत्या.त्या भौतिकशास्त्राच्या संशोधक आहेत. त्या म्हणाल्या ,आज 300 पेक्षा जास्त कॅडेटसनी या ठिकाणी पदवी घेऊन सैन्यदलात प्रवेश केला आहे.मात्र जास्त कौतुक वाटते ते 17 मुलींचे ज्यांनी अथक परिश्रम घेत सैन्यदलातील अधिकारी म्हणून रुजू होण्याचा मान मिळवला.या मुलींनी इतिहास रचला आहे कारण एनडीए संस्थेतून अधिकारी म्हणून बाहेर पडणारी ही पहिलीच तुकडी आहे.त्यांनी देशातील लाखो मुलींच्या मनात नवी आशा,उर्जा आणि जिज्ञासा निर्माण केली मी त्यांनी सॅलूट करते.
गुरुवारी एनडीएचा 148 वा पदवी प्रदान सोहला पार पडला यात सुमारे 339 कॅडेटस ना पदवी प्रदान कऱण्यात आली.यात बीए.बीएस्सी आणि बि.टेक.या पदवीचा समावेश आहे.यात प्रथमच 17 मुलींनी ना पदवी प्रदान करण्यात आली.
गुरुवारी चार कॅडेटस ना रोप्यपदक देण्यात आले यात मुलींमधील पहिल्या रौप्य पदाकीची मानकरी क्षीती दक्ष,लकी कुमार ,प्रीन्सकुमार कुशवाह,उदयसिंग नेगी यांना कुलगुरु डॉ.पूनम टंडन यांनी पदवीसह रौप्यपदक अणि ट्रॉफी प्रदान केली.