सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणावर लग्नसराई नसल्याने, तसेच कोणतेही सण, उत्सव नसल्याने काबाडकष्ट करून पिकवलेला माल आता कमी बाजारभावात द्यावा लागत असल्याने शेतकरी निराश होत आहेत. मागील काळामध्ये फुलशेतीने शेतकर्यांना पैसे मिळवून दिले होते. मात्र, तालुक्यात आता कोणत्याच पिकांना व फुलांना बाजारभाव नसल्याने शेतकर्यांपुढे अनेक प्रश्न व समस्या उभ्या राहिल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, टेकवडी, माळशिरस, दिवे, बेलसर, धालेवाडी, गुळुंचे, वाल्हे आदी गावात फूलशेती केली जाते.