निवडणूक आयोगाचा पोलिसांच्या बदल्यांवर बडगा : दोनवेळा खांदेपालट | पुढारी

निवडणूक आयोगाचा पोलिसांच्या बदल्यांवर बडगा : दोनवेळा खांदेपालट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 26) राज्यातील प्रमुख पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा तब्बल 414 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा बडगा दाखविल्याने या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील 41 पोलिस निरीक्षक, 20 सहायक निरीक्षक आणि 70 उपनिरीक्षक अशा 131 आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 13 पोलिस निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक आणि 39 उपनिरीक्षक अशा 64 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

मॅटकडून विचारणा, आयोगाने फटकारले

काही अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हाबाहेर केल्या होत्या. त्यानंतर काही अधिकारी मॅटमध्ये गेले होते. मॅटने निवडणूक आयोगाला विचारणा केल्यावर निर्देशानुसार बदल्या केल्या नसल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. आयोगाने फटकारल्यानंतर या बदल्या केल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button