Cyclone Murasu: बंगालच्या उपसागरात आठवड्यात दुसरे चक्रीवादळ? ‘मुरासू’मुळे आंध्र प्रदेशात अतिवृष्टीचा अंदाज

२ नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रात ५ नोव्हेंबरपर्यंत हलक्या सरींचा अंदाज
Cyclone
CyclonePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बंगालच्या उपसागरात आठवड्यात दुसरे चक्रीवादळ तयार होणार असून त्याचे नाव ‘मुरासू’ असे ठेवले जाण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. १ नोव्हेंबर) ते बंगालच्या उपसागरात तयार होईल. त्यानंतर सोमवारी ते आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. महाराष्ट्रात सर्वत्र ५ नाव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Cyclone
Marathi Movies Diwali Release: दिवाळीत सहा मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित; हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत कस लागणार!

बंगालच्या उपसागरात नुकतेच ‘अर्णब’ नावाचे चक्रीवादळ येऊन गेले. ते शांत होत नाही, तोच सात दिवसांच्या आतच ‘मुरासू’ नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. मुरासू हे संभाव्य नाव श्रीलंकेच्या यादीतील असून भारतीय हवामान विभागाने याला अजून पुष्टी दिलेली नाही. २ नोव्हेंबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.