Pune Shaniwar Wada Fire: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग लागल्याने खळबळ; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Shaniwar Wada Fire Pune Incident: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात वाळलेलं गवत आणि पालापाचोळ्याला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
Pune Shaniwar Wada Fire
Pune Shaniwar Wada FirePudhari
Published on
Updated on

Shaniwar Wada Fire Pune Incident: पुण्यातील ऐतिहासिक वारशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शनिवार वाडा परिसरात आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या ऐतिहासिक स्थळाजवळ धुराचे लोट दिसू लागल्याने नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये भीती पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार वाड्याच्या जवळच असलेल्या देसाई कॉलेजसमोर वाळलेलं गवत, पालापाचोळा आणि झाडांच्या फांद्यांना आग लागली. परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या कोरड्या पानांमुळे आग वेगाने पसरली आणि काही वेळातच धुराचे दाट लोट परिसरात पसरले.

Pune Shaniwar Wada Fire
Hardik Pandya: वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या अडचणीत! पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण?
Pune Shaniwar Wada Fire
Pune Shaniwar Wada FirePudhari

घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत काही वेळातच आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. आग वाढू नये म्हणून शनिवार वाड्याच्या एका प्रवेशद्वाराजवळही पाण्याचा फवारा मारण्यात आला. त्यामुळे मोठे नुकसान टळले.

Pune Shaniwar Wada Fire
Pune Shaniwar Wada FirePudhari

या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र आगीच्या घटनेमुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवार वाड्याजवळ मोठ्या प्रमाणात साचलेला पालापाचोळा आणि वाळलेले गवत यामुळे अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता वाढत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

Pune Shaniwar Wada Fire
Bhimashankar Village Relocation: भीमाशंकर परिसरातील स्थलांतराच्या चर्चेमुळे आदिवासींमध्ये नाराजी

दरम्यान, आग लागल्याची बातमी समजताच परिसरात काही काळ तारांबळ उडाली होती. मात्र अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

शनिवार वाडा हे पुण्यातील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ मानले जाते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी निगडित असलेले हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दरवर्षी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे या परिसराची सुरक्षितता आणि स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news