या उद्यानात वाढलेले गवत आणि झाडे-झुडपांमुळे नागरिकांना फिरण्यास व लहान मुलांना खेळण्यास अडथळा होत आहे. परिसरात सापांचा वावर असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान भीतीदायक ठरत आहे. या ठिकाणी होणार्या गैरकृत्यांना आळा बसवून, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.-सचिन विप्र,रहिवासी, कर्वेनगर.