

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांनी घातपात करून तिचा खून केल्याचे सांगत तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांची भेट घेतली. तसेच खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या वेळी त्यांनी खेड शिवापूर पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. राखी सतीश घोगरे (वय 30, रा. आर्वी, शेंडकरवस्ती, ता. हवेली) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी उघडकीस आली.
याबाबत सासू बायडाबाई विष्णू घोगरे, पती सतीश घोगरे (दोन्ही रा. आर्वी, शेंडकरवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सतीश याला अटक करण्यात आली आहे. सासूला अद्याप अटक झालेली नाही. पतीचे अनैतिक संबंध व शेताच्या कामावरून सतत जाच करून तिचा खून केल्याचा आरोप राखीच्या नातेवाइकांनी केला. पती व सासूवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादी कमल घोलप यांनी केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले.
हेही वाचा: