Pune Police Service Medals: पुणे पोलिस दलातील २४ अधिकारी-अंमलदारांना सेवा पदक; आयुक्त अमितेश कुमार यांचाही गौरव

दीर्घकाळ निष्कलंक व उल्लेखनीय सेवेची दखल; ‘अतिउत्कृष्ट’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदका’ने स्वातंत्र्यदिनी सन्मान
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: पोलिस दलात दीर्घकाळ निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांच्या कार्याची दखल घेत पुणे शहर पोलिस दलातील २४ जणांना 'अतिउत्कृष्ट सेवा पदक' आणि 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने १५ ऑगस्ट रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील संबंधित अधिकारी व अंमलदारांचा या पदकांनी गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ही पदके प्रदान करण्यात येतात.

Police
Chakan MIDC Problems: चाकण एमआयडीसीच्या समस्यांवर तातडीने तोडगा; उद्योजकांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आश्वासन

अतिउत्कृष्ट सेवा पदक

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील (पूर्व प्रादेशिक विभाग), राजेश बनसोडे (पश्चिम प्रादेशिक विभाग) सहायक पोलिस फौजदार : दिलीप दिगंबर झानपुरे (नियंत्रण कक्ष), नितीन तुळशीराम जगताप (लक्ष्मीनगर पोलिस ठाणे), राजस हुसेन शेख (गुन्हे शाखा), राजेंद्र आत्माराम पालांडे (गुन्हे शाखा), सत्यवान बबन साबळे (विश्रामबाग पोलिस ठाणे), संतोष भगवान कुचेकर (गुन्हे शाखा).

Police
Sugar Price Rise: साखर दरवाढीला केंद्राचा लगाम; कारखान्यांना सात दिवसांपेक्षा जास्त साठवणुकीवर बंदी

उत्कृष्ट सेवा पदक

सहपोलिस आयुक्त संजय दराडे (पुणे शहर), पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव (येरवडा पोलिस ठाणे), स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (सायबर पोलिस ठाणे), उमेश गिते (लक्ष्मीनगर पोलिस ठाणे). पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील ( समर्थ पोलिस ठाणे), पोलिस हवालदारः सुधीर इंगळे (स्वारगेट पोलिस ठाणे), योगराज घाटगे (स्वारगेट पोलिस ठाणे), मच्छिंद्र भंडारे (नियंत्रण कक्ष), सचिन अहिवळे (विश्रामबाग पोलिस ठाणे), राहुल माने (फरासखाना पोलिस ठाणे), संदीप पाटील (डेक्कन पोलिस ठाणे), शैलेश सुवे (विश्रामबाग पोलिस ठाणे), सत्यवान ढोंबरे (गुन्हे शाखा). पोलिस शिपाई : हनुमंत थोपटे (लक्ष्मीनगर पोलिस ठाणे). महिला पोलिस हवालदार : धनश्री विजय कामठे (विशेष शाखा).

Police
Baramati Solar Agriculture Feeder Scheme: बारामती परिमंडलातील १.४३ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज; ५८ हजार सौर कृषी पंपांचा लाभ

आयजी अशोक मोराळेही सन्मानित

विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) अशोक मोराळे यांना देखील त्यांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेत अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. मोराळे यांनी पुणे शहर पोलिस दलातही अपर पोलिस आयुक्त गुन्हे पदावर उल्लेखनीय काम केले आहे. सध्या ते आयजी एमटी म्हणून कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news