Pune Ganesh Darshan: कसबा-दगडूशेठनंतर भाजप नेत्यांच्या मंडळांना भेटी; फडणवीस-नबीन यांच्या गणेशदर्शनाची चर्चा

मानाच्या उर्वरित चार गणपतींसह काही प्रमुख मंडळे दौऱ्यात वगळली; स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संबंधित मंडळांना भेटी
Fadnavis Nitin Nabin Pune Ganesh Darshan
Fadnavis Nitin Nabin Pune Ganesh DarshanPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्याच्या गणेशोत्सवाची शान असलेल्या मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनाला राजकीय नेत्यांच्या दौऱ्यात नेहमीच विशेष स्थान असते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पुणे दौऱ्यात कसबा गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपती वगळता मानाच्या उर्वरित चार गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनाला फाटा देण्यात आला.

Fadnavis Nitin Nabin Pune Ganesh Darshan
Pune Ganeshotsav Tenders: पुणे गणेशोत्सवाच्या कामांतील ‘तुकडे’ थांबवले; चार स्वतंत्र निविदा रद्द, एकच निविदा काढण्याचे आदेश

त्याऐवजी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संबंधित मंडळांना भेटी देण्यात आल्याने गणेशदर्शनाच्या या दौऱ्याच्या प्राधान्यक्रमावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पुण्याच्या शतकाहून अधिक काळाच्या गणेशोत्सव परंपरेत ‘मानाच्या गणपतींसह काही प्रमुख गणेश मंडळांना असलेले महत्त्व आणि दौऱ्यातील स्थानिक राजकीय नेत्यांच्या मंडळांना मिळालेले स्थान यामुळे भाजपच्या गोटातच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Fadnavis Nitin Nabin Pune Ganesh Darshan
Pune Ganeshotsav Decorations: दीड दिवसांच्या विसर्जनानंतरच पुण्यात गणेश देखाव्यांना गर्दी; मध्यवस्तीत भक्तांचा जनसागर

जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पुण्यात आले होते. या पुणे गणेशदर्शन दौऱ्यात मानाच्या पाच गणपतींपैकी कसबा गणपतीचेच दर्शन घेण्यात आले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट देण्यात आली. उर्वरित चार मानाच्या गणपतींचा तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ व अखिल मंडई मंडळ या दौऱ्यात समावेश नव्हता.

Fadnavis Nitin Nabin Pune Ganesh Darshan
Pune Mumbai Expressway Rockfall Protection: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या ‘कनेक्टिंग लिंक’वरील रॉकफॉल प्रोटेक्शन नोव्हेंबरपर्यंत; ३० टक्के काम पूर्ण

पुण्यातील गणपतींच्या दर्शनासाठी आलेल्या या दोन्ही नेत्यांनी मानाच्या व इतर प्रमुख गणपती मंडळांना भेटी न देता भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मित्रमंडळ, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्रमंडळ तसेच महापौर मंजूषा नागपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. कसबा गणपतीनंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा या चार गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन या प्रमुख गणपती मंडळांना भेटी न दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Fadnavis Nitin Nabin Pune Ganesh Darshan
Maharashtra Land Bank: सरकारी जमीन आता एका क्लिकवर; महसूल विभागाची ‘महाराष्ट्र लँड बँक’ प्रणाली सुरू

गणेशदर्शनाला राजकीय रंग?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पुणे दौऱ्याला संघटनात्मकदृष्ट्या महत्त्व होते. गणेशदर्शनाच्या निमित्ताने स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांच्या मंडळांना दिलेल्या भेटींमुळे दौऱ्याला राजकीय किनार मिळाल्याची चर्चा आहे. मानाच्या गणपतींच्या परंपरेपेक्षा स्थानिक राजकीय संपर्कांना प्राधान्य मिळाले का? असा सवालही गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या मंडळांना प्राधान्य

फडणवीस-नबीन यांच्या गणेशदर्शन दौऱ्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांशी संबंधित मंडळांना मिळालेले स्थान आणि मानाच्या चार गणपतींचा समावेश केला नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. वरिष्ठ नेत्यांचे आपल्या मंडळात दर्शन घडवून आणणे, तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय वजन दाखवण्याचा प्रयत्न झाला का? याबाबत आता सवाल उपस्थित होत आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाची शतकाहून अधिक काळाची परंपरा असताना मानाच्या गणपतींपेक्षा स्थानिक राजकीय संपर्कांना मिळालेले महत्त्व हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news