पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग सहा पदरीऐवजी आठ पदरी करण्यात येणार आहे. त्यानुसार सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी 100 हेक्टर जागेची गरज भासणार आहे. या विस्तारीकरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने शासनाकडे पाठविला आहे. हा प्र कल्प पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती महामार्गाची वाहनांची क्षमता वाढणार आहे. सध्या द्रुतगती महामार्ग सहा पदरी आहे. दररोज सुमारे दीड लाख वाहने या महामार्गावर धावतात.
यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार केला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग सुमारे 94 कि.मी लांबीचा आहे. महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. याप्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीच्या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी जमिन खरेदी करण्यात येणार असून मोबदल्यापोटी द्यावयाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा