पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागाने राज्यातील शाळांची पर्यवेक्षकीय यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांना अचानक भेट देणे, विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे, शिक्षकांना अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास त्याबाबतची शिफारस शिक्षणाधिकार्यांना करणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील असर सर्वेक्षणात राज्यातील नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असतानाही अनपेक्षित परिणाम समोर येणे चिंताजनक असल्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा