संपूर्ण भारताच विचार केला तर जम्मू- काश्मीरपासून सिंधू खोरे, त्याखाली उत्तर प्रदेशपर्यंत गंगेचे मोठे खोरे अर्ध्या देशाची तहान भागवते. यातच नर्मदा आणि तापी आणि साबरमती ही मोठी खोरी आहेत. अनेक छोट्या- मोठ्या नद्या मिळून भारतात 12 पेक्षा जास्त खोरी आहेत. पूर्वोत्तर भारतात ब्रह्मपुत्रेचे खोरे आहे. मध्य भारतात गोदावरी, महानदी आणि दक्षिण भारतात कृष्णा, पेन्ना आणि कावेरी अशी खोरी आहेत. या खोर्यांत गेल्या दहा वर्षांचा पावसाचा ताळेबंद तपासला असता दक्षिण भारतातील मान्सूनमधील पावसाचे प्रमाण कमी होत आहे. मध्य ते दक्षिण भारतापर्यंत या भागातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सर्वात वाईट अवस्था पेन्ना नदीच्या खोर्याची आहे. या नदीतील 60 टक्के पाणीसाठा कमी झालेला आहे.