Erandwane Robbery: एरंडवणेत पहाटे रेस्टॉरंट-बारमध्ये दरोडा; शस्त्राच्या धाकाने रोकड लुटली

मास्क घालून आलेल्या चौघांनी 15 ते 20 हजारांची रोकड घेऊन पळ काढला; डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल
Erandwane Robbery
Erandwane RobberyPudhari
Published on
Updated on

पुणे : तोंडाला मास्क लावून आलेल्या चौघांनी एरंडवणे येथील एका रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये शस्त्राच्या धाकाने लुटमार केली. गल्ल्यातील पंधरा ते वीस हजारांची रोकड जबरदस्तीने घेऊन लुटारूंनी पळ काढला. याप्रकरणी, लक्ष्मीकांत मोहन गुंजकर (वय 35, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघा अनोळखी आरोपींच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.19) पहाटे दीडच्या सुमारास अनंत रेस्टॉरंट ॲण्ड बार शॉप क्रमांक तीन, सूर्या टॉवर म्हात्रे बिज रोड एरंडवणे परिसरात घडला आहे.

Erandwane Robbery
Engineers Suspended Pune: निकृष्ट डांबरीकरण भोवले; दोन अभियंते निलंबित

बुधवारी पहाटे तोंडाला मास्क लावलेले चौघेजण अनंत रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये घुसले. त्यांच्याकडे धारधार हत्यारे होती. त्या हत्याराचा धाक दाखून त्यांनी बारच्या गल्ल्यातील पंधरा ते वीस हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर चौघांनी तेथून पळ काढला.

Erandwane Robbery
Serious Crimes Analysis Pune: गंभीर गुन्ह्यांत आर्थिक दुर्बल सर्वाधिक

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर गुंजकर यांनी डेक्कन पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरणावरून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिषा निंबाळकर यांनी दिली.

Erandwane Robbery
Purandar Indrayani Rice Price: पुरंदरचा ‌‘इंद्रायणी‌’ भाव खाणार

पहाटे मारहाणीचा प्रकार

शहरात सोमवारी (दि.17) पहाटेदेखील याच रेस्टॉरंट बारमध्ये चौघांनी एका तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी, नारायण पेठेतील 27 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, डेक्कन पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुण बाथरुमधून बाहेर येत होता. त्यावेळी चौघांनी त्याला धक्का लागल्याच्या कारणातून बेदम मारहाण केली. मारहाणीत लोखंडी कडे लागल्याने तरुण जखमी झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news