

यंदापासून शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये यंदा पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार असून, संपूर्ण राज्यात पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी एकच अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. तसेच, हे वर्ग प्राथमिकला जोडणे आणि प्राथमिक शिक्षणात पाचवी आणि आठवीचे वर्ग चौथी आणि सातवीला जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आवश्यक तेथे अकरावी-बारावीचे वर्ग जोडून एकसंध शाळा निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. या प्रमुख दोन गोष्टींची अंमलबजावणी यंदा करण्यात येणार आहे.– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय