हिवाळी अधिवेशनावर सुशिक्षीत बेरोजगारांचा मोर्चा; वंचित बहुजन युवा आघाडीचा निर्धार

हिवाळी अधिवेशनावर सुशिक्षीत बेरोजगारांचा मोर्चा; वंचित बहुजन युवा आघाडीचा निर्धार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी नोकर भरती, शाळा खाजगीकरण, पेपरफुटी, परीक्षा शुल्क आणि शासकीय रिक्त भरती तातडीने करणे आदी मागण्या मार्गी न लावल्यास हिवाळी अधिवेशनावर सुशिक्षीत बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे सुजात आंबेडकर आणि प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेटयामुळे सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र शासन निर्णय मागे घेण्याची नुसती घोषणा केली असून अद्याप तसा शासन निर्णय किंवा मंत्रिमंडळ ठराव झाला नाही. त्यामुळे सरकारने कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, नुसती घोषणा न करता तात्काळ शासन निर्णय काढून सर्व प्रकारची कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी. सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे, स्पर्धा परिक्षेसाठी वाढीव फी रद्द करण्यात यावी, असे ही आंबेडकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा, राजस्थानच्या धर्तीवर एकच परिक्षा शुल्क आकारण्यात यावे, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकिय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने करण्यात यावी, केंद्र राज्य सरकारच्या विविध परिक्षांसाठी तालुका स्तरावर परिक्षाकेंद्र सुरु करावे, शिक्षण हक्क कायद्यानुसार १ ली ते १० वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण करून ह्या आधी शिक्षण दिलेल्या शाळांची थकित संपूर्ण रक्कम अदा करावी आदी मागण्या सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात अन्यथा अधिवेशनावर दणका मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणा पाठिंबाच

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यांचे नेतृत्व चांगले असून त्याला आमचा जाहीर पाठींबा आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय व्यक्तींना गावबंदी केली असेल तर नक्कीच पुढाऱ्यांना हा विचार करायला लावणारा आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news