मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी (दि. 26) उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. 25 हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा 10 किलोला 711 या उच्चांकी भावाने विकला गेला आहे, अशी माहिती सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली. नवीन कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आलेला नाही. बराखीत साठवून ठेवलेला जुना कांदा प्रामुख्याने विक्रीसाठी येत आहे. हा कांदा खूपच कमी शिल्लक राहिला आहे. शिवाय कांद्याची सड होण्याचे प्रमाण वाढले आहे.

इतर राज्यांत मागणी वाढल्याने कांद्याचे बाजारभाव कडाडले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजार आवारात 25 हजार कांदा पिशव्याची आवक झाली. मे. गोपालकृष्ण ट्रेडर्स किरण निघोट व चंद्रकांत थोरात, वसंतराव थोरात यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी नीलेश शांताराम टाव्हरे (निरगुडसर) यांच्या कांद्याला 10 किलोस 711 रुपये असा आतापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला. बदला कांदादेखील 30 रुपये किलो या भावाने विकला जातोय. परराज्यातून कांद्याला मागणी वाढलेमुळे कांद्याच्या बाजारभावात एवढी उच्चांकी वाढ झाल्याचे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
सुपर लॉट 1 नंबर गोळ्या कांद्यास- 651 ते 711 रुपये, सुपर गोळे कांदे 1 नंबर- 600 ते 651 रुपये, सुपर कांदे- 550 ते 600, सुपर मीडियम 2 नंबर कांद्यास- 400 ते 550 रुपये, गोल्टी कांद्या- 200 ते 400 रुपये आणि बदला कांदा- 200 ते 300 रुपये.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news