Ganesh Idol Making Workshop: शाडू मातीच्या बाप्पांसोबतच घडणार पर्यावरणदूत

Shadu Mati Ganpati Making: दहा शाळांमधील मुले गिरवणार; दैनिक ‘पुढारी’, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अन् पुणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम
Ganesh festival Pudhari
Ganesh festival PudhariPudhari
Published on
Updated on

Pudhari Eco Friendly Ganesh Idol Making Workshop for Student

पुणे: यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने दै. ‘पुढारी’ने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या विशेष सहकार्याने शहरातील प्रमुख 10 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातशालेय विद्यार्थी स्वतः शाडू माती वापरून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणार आहेत.

लहान मुलांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी आणि ते भविष्यात पर्यावरण रक्षणाचे दूत बनावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. मुलांची आकलनशक्ती तीव्र असल्यामुळे लहान वयात दिलेले संस्कार कायमस्वरूपी त्यांच्या मनात रुजतात. यामुळे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व त्यांना लहानपणापासूनच कळावे, यासाठी हा प्रयत्न दै. ‘पुढारी’च्या वतीने केला जात आहे. (Latest Pune News)

Ganesh festival Pudhari
Ganesh Visarjan Miravnuk: विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चेने तोडगा काढू; मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा निर्णय

या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी येथे होणार आहे. हा उपक्रम सॉलिटर ग्रुप यांच्या मुख्य प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. यासाठी गोयल गंगा ग्रुप, अ‍ॅटोट्रॉनिक्स इंजिनिअर प्रा. लि. हे एन्व्हॉयर्मेंट पार्टनर आहेत, तर भारती विद्यापीठ शैक्षणिक पार्टनर आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयू ग्रुप (डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन) हे को-पार्टनर म्हणून या उपक्रमात सहभागी आहेत. या उपक्रमात भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स या महाविद्यालयातील प्रावीण्य शिल्पकारांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयू या युनिव्हर्सिटीच्या मास मीडिया अँड कम्युनिकेशन यांचेही सहकार्य या उपक्रमास लाभणार आहे.

दै. ‘पुढारी’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी हाती घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टीचा आहे. पर्यावरणाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजवल्यामुळे, ते भविष्यात नक्कीच जबाबदार नागरिक बनतील. हा उपक्रम केवळ शाडू मातीची मूर्ती बनवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि तो पर्यावरणाची काळजी घेऊन साजरा करणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमातून तयार होणारे विद्यार्थी हेच भविष्यात पर्यावरणाचे खरे दूत बनतील, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या उपक्रमाला पूर्ण सहकार्य देत आहे आणि भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देत राहील. दै. ‘पुढारी’चे या महत्त्वपूर्ण कार्यासाठी मी अभिनंदन करतो.

- अविनाश ढाकणे, सदस्य सचिव (आयएएस), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Ganesh festival Pudhari
Ganesh Visarjan Guidelines 2025: राज्यात गणेश विसर्जनासाठी नवी नियमावली जारी, वाचा सविस्तर

दै. ‘पुढारी’ने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि तो पर्यावरणाची काळजी घेत साजरा करणे ही काळाची गरज आहे. लहान मुलांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवायला शिकवून आपण त्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल एक सकारात्मक बीज रोवत आहोत. हेच विद्यार्थी भविष्यात पर्यावरणाचे रक्षक बनतील, यात शंका नाही. ‘सॉलिटर ग्रुप’ नेहमीच सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांना पाठिंबा देत आला आहे आणि यापुढेही देत राहील.

- अतुल चोरडिया, संचालक, सॉलिटर ग्रुप

आम्हाला या पर्यावरण जागृती करणार्‍या उपक्रमाशी जोडले गेल्याचा अभिमान आहे. दै. ‘पुढारी’ वृत्तपत्राने सुरू केलेला हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. आजची पिढी ही उद्याचे भविष्य आहे आणि त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. शाडू मातीपासून मूर्ती बनवल्याने केवळ पर्यावरणाचेच रक्षण होत नाही, तर मुलांना आपल्या संस्कृतीशी आणि कलेशी जोडण्याची संधीही मिळते. ‘गोयल गंगा ग्रुप’ म्हणून आम्ही अशा चांगल्या कामांना नेहमीच प्रोत्साहन देऊ.

- अतुल गोयल, व्यवस्थापकीय संचालक, गोयल गंगा ग्रुप

दै. ‘पुढारी’ने शाळांमध्ये शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचा जो उपक्रम राबवला आहे, तो अत्यंत स्तुत्य आहे. पर्यावरणाचे महत्त्व मुलांना लहानपणापासूनच कळावे, यासाठी हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे आणि दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. लहान मुलेच आपल्या पर्यावरणाचे भावी रक्षक आहेत, त्यामुळे त्यांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे खूप आवश्यक आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढेल आणि पर्यावरणाची आवड निर्माण होईल, असा मला विश्वास आहे

- विजयमाला कदम, अध्यक्षा, शालेय समिती, भारती विद्यापीठ, पुणे

दै.‘पुढारी’चा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पर्यावरणाची काळजी घेत हा सण साजरा करणे काळाची गरज आहे. लहान मुलांना शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची सवय लावल्यामुळे त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल. पुणे महानगरपालिका या उपक्रमाला पूर्ण सहकार्य देत आहे. यामुळे भविष्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचा वापर कमी होऊन जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे.

- संतोष वारुळे, उपायुक्त, पर्यावरण विभाग, पुणे मनपा

गणेशोत्सवानंतर नदीपात्रात किंवा विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही जनजागृती करत आहोत. दै. ‘पुढारी’च्या या उपक्रमामुळे थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्व समजावून सांगता येत आहे. शाडूची माती पर्यावरणासाठी सुरक्षित असून, अशा मूर्तींचे विसर्जन करणे सोपे आणि प्रदूषणमुक्त आहे. हा उपक्रम शहराला अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नक्कीच हातभार लावेल.

- बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण् मंडळ, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news