E Crop Survey Offline Registration: ई-पीक पाहणी आता ऑफलाइन! 15 जानेवारीपर्यंत नोंदणीची संधी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ॲपवर नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय; पीक विमा व अनुदानाचा मार्ग मोकळा
E-Peek Pahani
E-Peek PahaniPudhari File Photo
Published on
Updated on

बारामती : ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता ई-पीक पाहणीची ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे.

E-Peek Pahani
Border Ultra Marathon: वाळवंटात बारामतीच्या युवकांची जिगर! बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण

या निर्णयाचा पुणे आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी 15 जानेवारीपर्यंत ऑफलाइन नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत शेतकरी संबंधित तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा महसूल विभागाच्या मदतीने आपल्या शेतातील पिकांची माहिती नोंदवून घेऊ शकणार आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नोंदणी राहून गेलेल्या शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.

E-Peek Pahani
School safety issue Maharashtra: वर्गात शिरले साप! पाटस येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना स्मार्टफोनचा अभाव, इंटरनेटची समस्या तसेच ॲपवरील तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी नोंदणी करता आली नव्हती. परिणामी, राज्यातील सुमारे अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहिले होते. ई-पीक पाहणी नोंदणी ही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, शासकीय अनुदान, पीक विमा व कर्जासाठी आवश्यक असल्याने या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

E-Peek Pahani
Gram Panchayat funding: थेट अधिकार असूनही ग्रामपंचायती निधीविना अडचणीत; ‘ग्रामस्वराज्य’ कागदापुरतेच?

आता ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकांची अचूक नोंद करता येणार आहे. यामुळे भविष्यात शासकीय योजना, आपत्ती मदत, पीक विमा आणि आर्थिक सहाय्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून, ई-पीक पाहणी प्रक्रियेतून कोणीही वंचित राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news