Dumper Accident: कर्णकर्कश हॉर्नमुळे दुचाकी स्लीप; वडगाव शेरी युवकाचा डंपरखाली मृत्यू

विमाननगरमध्ये रात्री घडलेला दुचाकी आणि डंपर अपघात; चालक फरार, पोलीस शोधत
Dumper Accident
Dumper AccidentPudhari
Published on
Updated on

पुणेः डंपरचालकाने जोरात हॉर्न वाजविला. त्यामुळे समोरील दुचाकीस्वार दुचाकी स्लीप झाल्याने खाली पडला. पाठीमागील डंपर अंगावरून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन वसंत धुमाळ (वय. 28,रा. मल्हारनगर वडगाव शेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Pune News)

Dumper Accident
Reduce GST on Books: पुस्तक आणि कागदावरील जीएसटी कमी करण्याची मागणी; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचा अर्थमंत्री यांना पत्र

याप्रकरणी, सचिन याचा मित्र स्वप्निल भानुदास माने (वय. 25,रा. सोमनाथनगर, मूळ. परभणी) याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डंपरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास टाटा गार्ड रूम बस स्टॉप जवळ विमाननगर परिसरात घडली आहे.

Dumper Accident
Hadapsar Burglary Arrest: हडपसरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक; पिस्तुलासह १८ लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने आणि मृत सचिन हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. या वेळी सचिन दुचाकी चालवित होता. पाठीमागून आलेल्या डंपरचालकाने जोरात हॉर्न वाजविला. त्यामुळे दुचाकी स्लीप झाल्याने दोघे खाली पडले. त्यावेळी डंपर अंगावरून गेल्याने सचिन याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news