लग्नसराईमुळे बाजारपेठा पुन्हा सजू लागल्या

लग्नसराईमुळे बाजारपेठा पुन्हा सजू लागल्या
Published on
Updated on

भोसरी : पुढारी वृत्तसेवा :

दागिने, कपडे इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी

तुळशी विवाहनंतर लग्नसराईस सुरवात होते. त्यातच राज्य सरकारने लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे खरेदीला उधाण आले आहे. विवाह मोठ्या थाटामाटात साजरे होत असल्याने बाजारपेठेत पुन्हा एकदा लगबग पाहायला मिळत आहे.

मोठ्या धुमधडाक्यात लग्नसोहळे पार पडत आहेत. त्यासाठी भोसरी परिसरातील दुकाने सजू लागली आहेत.

लग्नसराईची तयारी व लगबगदेखील सगळीकडे पाहायला मिळत आहे. परिणामी दागिने खरेदी, कपडे, मंडप, डेकोरेटर्स, केटरर्स, लॉन्स, मंगल कार्यालय, वाजंत्री अशा सगळ्याच क्षेत्रात लगबग दिसू लागली आहे.

तसेच, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या सावटाखाली गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले विवाह सोहळे मोठ्या धामधुमीत साजरे होत आहेत. लग्न समारंभाचे नियोजन अनेकांनी यापूर्वीच केले आहे.

आता प्रत्यक्षात लग्नाचा बस्ता दागिने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसायला लागली आहे.

अनेकांनी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा करायचा ठरविले आहे. परंतु , गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सावटामुळे तसेच प्रशासनाने लग्नकार्यासाठी नियमावली लागू केल्याने लग्न कार्य थाटामाटात साजरा करता आले नाहीत.

मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत काहींनी विवाह सोहळा उरकले तरी काहींनी विवाह पुढे ढकलले होते.

लसीकरणाचा वाढता वेग आणि कोरोना रुग्णांची कमी होणारे रुग्ण संख्या यामुळे विवाह सोहळा थाटामाटात साजरा करण्याचा बेत आखले जात आहेत.

त्याकरिता लग्नाची जमवाजमव यापूर्वीच पूर्ण झालेली असल्याने आता प्रत्यक्षात विवाहाचे नियोजन सुरू आहे.

तुळशी विवाहानंतर लग्नकार्यस सुरवात होत असल्याने बाजारात खरेदीची लगबग दिसत आहे. लग्नसराईमुळे शहरातील विविध कपड्यांच्या दुकानांमध्ये प्रचंड मोठी गर्दी दिसून येत आहे.

लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी लगबग सुरू आहे. तसेच, कन्यादानासाठी वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होउ लागली आहे.
लॉन्स, मंगल कार्यालय चालक, हॉटेल्स, केटरर्स, वाजंत्रीपासून, लग्नपत्रिका प्रिंटिंग, फुलबाजार, आदींनी मागणी वाढू लागली आहे.

लग्नात वधूला दिली जाणारी संसारोपयोगी भांडीचे दुकानेदेखील गर्दी होत आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांची उलाढाल लग्नसराईत
होणार आहे.

अगदी साखरपुड्यापासून ते रिसेप्शनपर्यंत येणार्‍या प्रत्येक सोहळ्यात वेगवेगळे ड्रेस व दागिने घालण्याचा नवीन ट्रेड सुरू झाला आहे. नववधू करता वेगवेगळे दागिने हे आकर्षण ठरत आहे.

लग्नसोहळ्यात सोनेचे दागिने तर रिसेप्शन व इतर कार्यक्रमा करिता टेम्पल ज्वेलरी, ऑक्साइड दागिन्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

इलेक्ट्रिकल वस्तुंची गर्दीला प्राधान्य

फ्रिज, वॉशिंग मशीन आणि डिश वॉश तसेच दैनंदिन वापरात लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी वाढत आहे. ग्राहकांना कर्ज पुरवठा करणार्‍या बँकेकडून सुलभ मासिक हप्ते आणि सर्वसामान्यांनाही परवडणारे व्याजाचे दर व आकर्षक ऑफर्स यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स वस्तूंना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news