Dry Fruits Price Hike: डॉलरच्या वाढीचा बसला सुकामेव्याला फटका; भावात किलोमागे 100 ते 300 रुपयांची वाढ

आयात खर्च वाढल्याने बदाम, पिस्ता, काळा मनुका महागला
Dry Fruits Price Hike
Dry Fruits Price HikeFile Photo
Published on
Updated on

पुणे: आखाती युद्धामुळे रुपयाचे अवमूल्यन आणि इंधन दरवाढीने वाढलेला वाहतूक खर्चाने सुकामेव्याच्या बाजारात पुन्हा एकदा दरवाढीची लाट आली आहे. विशेषतः आयातीवर अवलंबून असलेल्या बदाम, मॉमेरॉन बदाम, काळा मनुका आणि खारा पिस्ता यांच्या दरात महिनाभरात किलोमागे 100 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी, आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुकामेवा खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

अमेरिका, अफगाणिस्तान, इराण आणि मध्य आशियातील देशांतून सुकामेव्याची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. मात्र, रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने आयातदारांचा खर्च वाढला असून, त्याचा परिणाम दरांवर होत आहे.

Dry Fruits Price Hike
Night Curfew Pune: रात्री दहानंतर पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवा; आम आदमी पक्षाची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे मागणी

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि कंटेनर भाड्यातील चढउतार यामुळेही बाजारभाव वधारले आहेत. पुढील काही महिन्यांत डॉलरचा दर उच्च पातळीवर राहिला तर सुकामेव्याच्या भावात आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, काजू आणि बेदाणा हे मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत उत्पादन असल्याने त्यांच्या दरांवर जागतिक चलन बाजाराचा फारसा परिणाम झालेला नाही.

Dry Fruits Price Hike
Mundhwa Illegal Hoardings Action: मुंढवा परिसरातील अनधिकृत होर्डिंग अखेर हटविले

सुकामेव्याच्या बहुतांश प्रकारांची आयात परदेशातून केली जाते. डॉलरचा दर वाढल्याने आयात खर्च आणि वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे बदाम, पिस्ता, काळा मनुका यांसारख्या वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र, काजू आणि बेदाणा हे देशांतर्गत उत्पादन असल्याने त्यांच्या दरात सध्या कोणतीही मोठी वाढ झालेली नाही.

- नवीन गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news