पुण्यातील ‘त्या’ वाहनचालकास दोन वर्षांची शिक्षा

पुण्यातील ‘त्या’ वाहनचालकास दोन वर्षांची शिक्षा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण करत त्याचा गणवेश फाडणार्‍या गफूर शहाबुद्दीन शेख (वय 27, रा. गुलटेकडी) या वाहनचालकाला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 'सिग्नल का तोडला,' असे विचारल्याच्या कारणावरून घडलेल्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या वकिलाने न्यायालयात नोंदविलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्याआधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला.

ही घटना 19 मार्च 2014 रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान गंगाधाम चौकात घडली. याबाबत पोलिस कर्मचारी आनंद प्रकाश गड्डुरे यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने दोन वेळा गंगाधाम चौकातील सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले.

त्याबाबत फिर्यादींनी जाब विचारला असता, आरोपीने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत धमकावले, तसेच गणवेश फाडून त्यावरील नेमप्लेटचे नुकसान केले. साक्षीदार असलेले अ‍ॅड. चेतन भुतडा यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला घडलेला प्रकार कळविला. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अ‍ॅड. भुतडा यांची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news