पुणे : डबल डेकर बसला पीएमपीचा ‘स्टार्टर’

पुणे : डबल डेकर बसला पीएमपीचा ‘स्टार्टर’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत 'डबल डेकर'च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नुसत्याच चर्चेच्या वर्तुळात अडकलेल्या 'डबल डेकर'ला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. अनेक दिवसांपासून पुण्यात पीएमपी प्रशासन डबल डेकर बस आणणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेला गुरुवारी पूर्णविराम मिळाला.

संचालक मंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून, पहिल्या टप्प्यात दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासन भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पीएमपीच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार आणि पीएमपीतील विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित होते.

बस खरेदीला मान्यता
200 सीएनजी बस
100 इलेक्ट्रिक बस
100 पैकी 20 डबल डेकर बस
या मार्गांवर धावणार बस : भोसरी-निगडी, मनपा-बाणेर, कात्रज-हडपसर, कात्रज-हिंजवडी (प्रस्तावित)

डबल डेकरचे असे होणार वाटप
60-40 नुसार वाटप करण्याचे नियोजन
पुणे हद्दीत 12 डबल डेकर बस धावणार
पिंपरी-चिंचवड हद्दीत 08 बस धावणार

संचालक मंडळाची बैठक झाली. यात डबल डेकरबाबत प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. बस खरेदीचा निर्णय दोन्ही महापालिका घेतील.

                                                ओमप्रकाश बकोरिया,
                             अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news