पुणे : आता बीएस्सी इकॉनामिक्स हा चार वर्षाचा अभ्यासक्रम झाला असून एमएस्सी केवळ एक वर्षात करता येईल. त्यामुळे बीएस्सी नंतरही भेंट पीएचडी करता येईल, अशी सोय गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नव्या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे.
गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधला तेव्हा ही माहिती दिली. ते म्हणाले, जसे स्पर्धेचे युग बदलत आहे. तसे अभ्यासक्रमांचे स्वरुप बदलले पाहिजे या विचाराने आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची आखणी होत आहे.
बीएस्सी अभ्यासक्रम तीन वर्षांचा होता. तो चार वर्षाचा करून एमएस्सी एक वर्षाचे केले आहे. डॉ. रानडे म्हणाले, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही जिओपॉलिटिक्स व जिओइकोनॉमिक्स हे विषय सुरू करीत आहोत. यासाठी स्वतंत्र केंद्र केले असून त्याला जिओस्केर असे नाव दिले आहे. एमएस्सी इकोनॉमिक्स यात हे दोन्ही विषय जोडले आहेत.
गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना तुमची फी परवडत नाही. प्रवेश चाचणीत पास होऊनही ते शेवटी सस्थेत प्रवेश घेऊ शकत नाहीत. या प्रश्नावर डॉ. रानडे म्हणाले, आमची संस्था स्वायत्त आहे. फक्त प्राध्यापकांचे पगार सरकार करते बाकी गोष्टी आम्हाला उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे फी कमी करणे शक्य होत नाही तरीही गरबी विद्यार्थ्यांनी अर्ज केला तर त्यावर निश्चित विचार करू,