राम नदीत एन्झाइमचा वापर नको : एनजीटीचे महापालिकेला आदेश

राम नदीत एन्झाइमचा वापर नको : एनजीटीचे महापालिकेला आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राम नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या एन्झाइमचा वापर करू नका, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिकेला केले आहेत. एन्झाइम टाकल्याने नदीच्या पाण्यावर काय परिणाम होईल, याची माहिती नसताना अशा प्रकारचे प्रयोग करू नयेत म्हणून एनजीटीने हा निर्णय घेतला आहे. राम नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी महापालिका चाचणी न झालेल्या आणि वादग्रस्त असलेल्या एन्झाइमचा वापर करणार होती. या निर्णयावरून नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेत याचा पुनर्विचार करण्याची विनंती पालिकेकडे केली होती. मात्र, याविषयीचे वृत्त वर्तमानपत्रात आल्यानंतर एनजीटीने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत एन्झाइम टाकल्याने नदीच्या पाण्यावर काय परिणाम होईल, याची माहिती नसताना अशा प्रकारचे प्रयोग करू नयेत, असे आदेश दिले.

दरम्यान, कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय पर्यावरणाशी खेळ करणार्‍या पालिकेला रोखून कायद्याचे पालन करण्यास भाग पाडले आहे. नदी स्वच्छतेच्या नावाखाली फायदा करून देण्याचा राजकीय डावपेच एनजीटीच्या निर्णयामुळे उघड झाला आहे. त्यामुळे एनजीटीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. राम नदीच्या स्वच्छतेसाठी दीर्घकालीन आणि नदीच्या पर्यावरणाला पोषक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच राजकीय स्वार्थांमुळे नदीसारख्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश रोखण्यासाठी जनआंदोलन आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news