Diwali Swarsandhya 2025: पं. रघुनंदन पणशीकर यांच्या मंगल स्वरांनी होणार दिवाळी संस्मरणीय, स्वरसंध्येच्या प्रवेशिका इथे उपलब्ध

Pandit Raghunandan Panshikar: यंदा दिवाळीचे पर्व रसिकांसाठी खास ठरणार
Pudhari Diwali Swar Sandhya 2025
Pudhari Diwali Swar Sandhya 2025Pudhari
Published on
Updated on

Pudhari Diwali Swar Sandhya 2025

पुणे : दिवाळी पहाट कार्यक्रमांनी दिवाळीतील पहाट सूरमयी होतेच...पण, दिवाळीची रात्रसुद्धा अशीच सूरेल बनली तर, तो क्षण प्रत्येक रसिकांसाठी आनंदाचा असेलच...हो, रसिकांना अशीच सूरांच्या आतषबाजीने रंगलेली रात्र दिवाळी स्वरसंध्या या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.

दै. पुढारी माध्यम समूहाच्या वतीने धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.18) मंगल स्वरांची सूरमयी मैफल - दिवाळी स्वर संध्या हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर आणि गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या सूरेल गायकीने दिवाळीची रात्र अधिकच सूरेल होणार आहे. शास्त्रीय, भावगीते, नाट्यगीते, अभंग, अन् अगदी दिवाळीवरची खास बंदिशही रसिकांना ऐकायला मिळणार असून, त्यामुळे दिवाळीचे पर्व रसिकांसाठी खास ठरणार आहे. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Pudhari Diwali Swar Sandhya 2025
Pune air pollution Diwali shopping: पाऊस थांबताच पुण्यात वाढले प्रदूषण; दिवाळी खरेदीमुळे वाहनधुराचा त्रास

दिवाळी पाडव्याला सागीतिक कार्यक्रमांची पर्वणी रंगतेच...दै. पुढारी माध्यम समूहाच्या वतीनेही दरवर्षी विविध दिग्गज अन्‌‍ नवोदित कलाकारांच्या गायकीने सजलेला दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातोच. पण, यंदा हा ट्रेंड बदलत दिवाळीनिमित्त दै. पुढारी माध्यम समूहाने स्वरसंध्येचे आयोजन केले आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला असून, पं. रघुनंदन पणशीकर यांच्या अनुभवी गायकीने अन्‌‍ मंजुषा पाटील यांच्या दमदार गायकीने हा कार्यक्रम बहरणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड तर एज्युकेशन पार्टनर ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहेत. तर ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌‍स आहेत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक कोहिनूर ग्रुप, अमर बिल्डर्स, नाईकनवरे बिल्डर्स आणि संजय काकडे ग्रुप आहेत.

कार्यक्रमातील सादरीकरणाविषयी बोलताना पं. रघुनंदन पणशीकर म्हणाले, दिवाळी पहाटची ही परंपरा आजही अवितरतपणे सुरू आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना रसिकांची दाद मिळतेच. पुढारीने स्वरसंध्या आयोजित करून सायंकाळची सुरेल मैफल रसिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचा आनंद आहे. दिवाळी स्वर संध्येचा उपक्रमही खूप आनंद देणारा आहे, सांस्कृतिक वाटचालीसाठी हा उपक्रम चांगला आहे. आम्ही शास्त्रीय, भावगीते, नाट्यगीते यासह दिवाळीवरची बंदिशही सादर करणार आहे.

मंजुषा पाटील म्हणाल्या, हा कार्यक्रम खूप आगळावेगळा असणारा आहे. कारण, आम्ही रात्री दिवाळीनिमित्त सांगीतिक कार्यक्रम सादर करणार आहोत. अनेक वर्षांनी मी रात्री सांगीतिक कार्यक्रम सादर करणार असल्याने त्याचेही एक वेगळेपण कलाकार म्हणून मला वाटते. ही दिवाळीची स्वर संध्या आहे, हेही एक वेगळेपण आहे. दै. पुढारीने हे निमित्त रसिकांना उपलब्ध करून दिले आहे, याचा आनंद आहे.

Pudhari Diwali Swar Sandhya 2025
Marathi Movie: मराठी चित्रपटांच्या अडचणींचा अभ्यास करणार 'समिती', 45 दिवसात सरकारला अहवाल देणार

कार्यक्रम कधी व कोठे

कार्यक्रम कधी - शनिवार, 18 ऑक्टोबर

कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

वेळ : रात्री नऊ वाजता : कार्यक्रम वेळेत सुरू होईल, याची रसिकांनी नोंद घ्यावी.

कुठे मिळतील प्रवेशिका?

दैनिक पुढारीच्या कार्यालयातही रसिकांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळणार आहेत. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील (पाटील प्लाझासमोर) पुढारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी सहा यावेळेत प्रवेशिका मिळतील. कर्वे रस्त्यावरील देसाई बंधू आंबेवाले येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या कोथरूड येथील चार शाखांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6, टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका मिळतील. सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रवेशिका उपलब्ध असतील. बेडेकर गणपती मंदिराचे सभागृह, कोथरूड येथेही कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळतील. येथे सकाळी 9 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळणार मंगळवारपासून

कार्यक्रमाच्या प्रवेशिका मंगळवारपासून (दि.14) मिळणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश असेल आणि प्रथम येणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news