वर्षाविहाराला जाताय,खोल पाण्यात उतरू नका!; जिल्हाधिकार्‍यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू

Rainy Season picnic: पर्यटनस्थळांच्या परिसरात जिल्हाधिकार्‍यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू
Bhushi Dam
पर्यटनस्थळांच्या परिसरात जिल्हाधिकार्‍यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू Pudhari
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात 31 ऑगस्ट 2025 पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. (Pune News Update)

दरम्यान, मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. हवामान विभागाने शनिवारपासून (दि.14) जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

Bhushi Dam
Pune News: ‘एक जिल्हा एक नोंदणी’तील दस्तनोंदणीत अनेक गैरप्रकार!

लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर ठिकाणांच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार पावसामुळे वेगाने वाहणार्‍या पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्‍यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध राहील.

Bhushi Dam
10th suppliment Exam: पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध

पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.

सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे यंत्रणा वाजविणे, गाडीतील स्पीकर, वूफर मोठ्या आवाज वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध असेल. धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news