

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्या दहावी, बारावीच्या जून-जुलै पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट आज, दि.12 पासून शाळा-महाविद्यालयांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित हॉलतिकीट विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये होणार आहेत. त्यानुसार इयत्ता बारावी अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत आहे. तसेच इयत्ता बारावी माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पध्दतीने 15 व 16 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे. तर 24 जून ते 8 जुलै या कालावधीत दहावीचे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे.