Digital Detox Youth India: ‘ऑफलाइन आनंदा’कडे तरुणाईचा कल; डिजिटल डिटॉक्सकडे वाढती ओढ

सोशल मीडियापासून अंतर ठेवत छंद, कुटुंब आणि प्रवासातून आनंद शोधतेय नवी पिढी
Digital Detox Youth India
Digital Detox Youth IndiaPudhari
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे : सतत मोबाईल, सोशल मीडियाचा वापर अन्‌‍ आयटी कंपनीतील वर्कफ्रॉम होममुळे स्नेहाच्या आयुष्यात कुठेतरी कामाचा ताण वाढला. त्यामुळेच तिचा कुटुंबीयांसोबतचा संवाद अन्‌‍ आनंदही हरपला होता. अशावेळी आनंद शोधण्यासाठी तिने महत्त्वाचे पाऊल उचलले ते सोशल मीडियाचा कमी वापर अन्‌‍ प्रत्यक्ष संवादाने आनंद शोधण्याचा....मग काय?. नोकरीतून अन सोशल मीडियावरून बेक घेत तिने एकाकी भटंकतीचा (सोलो ट्रॅव्हलिंग) मार्ग निवडला. तिने जम्मू-काश्मीरला पर्यटनाचा आनंद घेतला. आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी स्नेहा आता विकेंडला फिरायला जाते अन्‌‍ जगण्याचा खरा प्रत्यक्ष आनंद घेत आहे.

Digital Detox Youth India
Pune Crop Damage: जिल्ह्यात अवकाळी पाऊस; गारपिटीने 844 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

फक्त स्नेहाच नव्हे तर आज कित्येक तरुण-तरुणींचा ऑफलाइन आनंद शोधण्याकडे कल वाढला आहे. सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे ताण आणि एकटेपणा वाढत असल्याची जाणीव तरुणांना होत आहे. त्यामुळे अनेक जण दिवसातून काही तास मोबाईलपासून दूर राहणे किंवा सोशल मीडियावरून काही काळ बेक घेणे, अशा गोष्टी ते करत आहेत. तरुणाई प्रत्यक्ष आनंदाचे क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी (दि. 20 मार्च) साजऱ्या होणाऱ्या जागतिक आनंद दिवसानिमित्त (वर्ल्ड हॅप्पीनेस डे) दै. ‌‘पुढारी‌’ने या ट्रेंडविषयी जाणून घेतले. 20 ते 35 वयोगटातील तरुणाई छंद जोपण्याला महत्त्व देत आहे. गायन, वादन, अभिनय, चित्रकला, भाषा शिक्षण, पाककला, संगीत, या कलाशिक्षणाकडे ते वळले आहेत. तर पर्यटन, नाटक पाहणे, मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी, कुटुंबीयांना वेळ देणे, त्यांच्याशी संवादासह तरुणाई योगा, गिर्यारोहण, सायकलिंग अशा उपक्रमांकडेही वळली आहे.

Digital Detox Youth India
Unseasonal Rain | खुलताबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

याविषयी आयटी कंपनीत काम करणारा रवींद्र पुजारी म्हणाला, मी आयटी कंपनीत काम करतो. सततच्या ऑनलाइन कामाच्या ताणामुळे स्वत:ला वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे रोजच्या जगण्याचा आनंद घेणेच आम्ही आयटी क्षेत्रातील नोकरदार विसरून जातो. पण, मी यातून एक मार्ग काढला आहे. मी सोशल मीडियाचा वापर कमी केला आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालविणे आणि छंद जोपासत आनंदात जगण्याला प्राधान्य देत आहे.

Digital Detox Youth India
Baneswar Bee Accident: मधमाशांचे पोळे काढताना तरुणाचा मृत्यू; वनविभाग आणि ट्रस्टने हात केले वर

आनंदी जगण्यासाठी हे करा

रोज व्यायाम आणि योग्य आहार करण्याला महत्त्व द्या.

आपल्याला आवडत्या छंदाला वेळ देणे.

आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलावे, फिरायला जावे.

डायरी लिहून मनातील गोष्टी व्यक्त करणे.

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा.

Digital Detox Youth India
Yerwada Cat Dispute: ‘मांजराच्या घाणी’वरून येरवड्यात तुफान वाद; शेजाऱ्यांमध्ये मारहाण, प्रकरण पोलिस ठाण्यात

आजच्या तरुणाईला नैराश्येतून बाहेर काढत त्यांना सकारात्मक आणि आनंदी जगण्याचा मार्ग आम्ही प्रेरक वक्ते दाखवत आहोत. मी आयटी कंपनीसह विविध कंपन्यांमधील नोकरदार तरुणाई आणि महाविद्यालयीन तरुणाईसाठी कार्यशाळा घेते. त्यांना आरोग्याचे महत्त्व सांगून त्यांना जीवनाकडे सकारात्मकतेने कसे पाहावे, हे सांगते. ‌‘डिजिटलपेक्षा रिअल‌’ हा नवा आनंदाचा मंत्र तरुणाई स्वीकारताना दिसत आहे.

स्फूर्ती सहारे, प्रेरक वक्त्या (मोटिव्हेशनल स्पीकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news