Pune Crop Damage: जिल्ह्यात अवकाळी पाऊस; गारपिटीने 844 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सहा तालुक्यांतील ४६ गावांमध्ये ८४४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान; गहू, हरभरा, कांदा व फळबागांना मोठा फटका
पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील कलिंगडाच्या शेती, तसेच दौंड तालुक्यात काढणीच्या अवस्थेतील गहू आणि केळी बागांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. (छायाचित्रे ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय).
पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील कलिंगडाच्या शेती, तसेच दौंड तालुक्यात काढणीच्या अवस्थेतील गहू आणि केळी बागांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. (छायाचित्रे ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय).Pudhari
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे व काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे मागील दोन ते तीन दिवसांत रब्बी हंगामातील काढणीच्या अवस्थेतील गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय कांदा, भाजीपाला, फुलपिके आणि फळबागा मिळून एकूण 844 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान पुरंदर तालुक्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील कलिंगडाच्या शेती, तसेच दौंड तालुक्यात काढणीच्या अवस्थेतील गहू आणि केळी बागांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. (छायाचित्रे ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय).
Unseasonal Rain | खुलताबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

विजेच्या कडकडासह काही भागांत गारांसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. विशेषतः काढणीच्या अवस्थेतील गहू, हरभरा पिकास याचा फटका बसला आहे. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, काकडी, फुलपिके, चारापिके, डाळिंब, कलिंगड, केळी बागांचे नुकसान झाले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास भाजीपाला आणि फळबागांना आणखी फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील कलिंगडाच्या शेती, तसेच दौंड तालुक्यात काढणीच्या अवस्थेतील गहू आणि केळी बागांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. (छायाचित्रे ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय).
Baneswar Bee Accident: मधमाशांचे पोळे काढताना तरुणाचा मृत्यू; वनविभाग आणि ट्रस्टने हात केले वर

अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या

नुकसानीची स्थिती. (क्षेत्र-हेक्टरमध्ये)

बाधित तालुका ः क्षेत्र ः नुकसान झालेली पिके

हवेली ः 170 ः गहू, कांदा, भाजीपाला, डाळिंब

राजगड ः 3.70 ः गहू, कांदा, भाजीपाला, काकडी, कलिंगड

दौंड ः 110.20 ः हरभरा, केळी, गहू, कांदा, भाजीपाला, फुले

पुरंदर ः 389.80 ः गहू, कांदा, भाजीपाला, फळ, फुल, चारापिके

शिरूर ः 93 ः गहू, कांदा, भाजीपाला, फळपिके

भोर ः 78 ः गहू, कांदा, भाजीपाला

एकूण 6 तालुके ः 844.70

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील कलिंगडाच्या शेती, तसेच दौंड तालुक्यात काढणीच्या अवस्थेतील गहू आणि केळी बागांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. (छायाचित्रे ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय).
Yerwada Cat Dispute: ‘मांजराच्या घाणी’वरून येरवड्यात तुफान वाद; शेजाऱ्यांमध्ये मारहाण, प्रकरण पोलिस ठाण्यात

नुकसानग््रास्त क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता

पुरंदर तालुक्यातील 10 गावांतील 1 हजार 283 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यातील 12 गावांमधील 390 शेतकरी, राजगडमधील एका गांवात 21 शेतकरी, दौंडमध्ये 4 गावांतील 243 शेतकरी, शिरूरमधील 8 गावांतील 152 शेतकरी, तर भोरमधील 11 गावांतील 258 शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे प्राप्त स्थानिक अहवालावरून दिसून येत आहे. तर, जिल्ह्यात सहा तालुक्यांतील 46 गांवांमधील एकूण 2 हजार 347 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानग््रास्त पिके व फळबागांचे पंचनामे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास सध्याच्या नुकसानग््रास्त क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news