

धायरी: मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महमार्गालगत विश्वास हॉटेल समोर वडगाव बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्याची लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
यामुळे येणारे जाणारे नगरीक मोठी हळहळ व्यक्त करीत होते. येथे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू होते. दरम्यान हे काम करीत असताना जेसीबीच्या धक्काने ही पाण्याची लाईन फुटली. यामुळे येथे मोठे पाण्याचे तळे निर्माण झाले होते.
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश गावित यांनी सांगितले की, तातडीने ही फुटलेली पाण्याची लाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी पाण्याचे मोठं मोठे पाण्याचे कारंजे उंच उडत होते.
फोटो ओळ-विश्वास हॉटेल समोर पाईप लाईन फुटल्याने उडणारे पाण्याचे कारंजे( छाया-मिलिंद पानसरे )