Dhayari Narhe Basic Facilities Protest: मूलभूत सुविधांसाठी भाजप नगरसेवकाचे पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन; रक्षाबंधनही आंदोलनस्थळीच!

धायरी-नऱ्हे-सिंहगड रोड परिसरातील रस्ते, पाणी, डीपी रस्ते, ड्रेनेजच्या प्रश्नांवर राजाभाऊ लायगुडेंचा आक्रमक पवित्रा
Dhayari Narhe Basic Facilities Protest
Dhayari Narhe Basic Facilities ProtestPudhari
Published on
Updated on

खडकवासला: धायरी, नऱ्हे, सिंहगड रोड परिसरात वर्षानुवर्षे रस्ते, विकास आराखडा, स्वच्छता, आरोग्य, ड्रेनेज, पदपथ, आदी मूलभूत सुविधांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही. पालिकेच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी रक्षाबंधनही त्यांनी मुख्यालयातच साजरे केले‌.

Dhayari Narhe Basic Facilities Protest
Pune Solapur Highway Potholes: रवीदर्शन-कवडीपाट महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात; ‘अजून किती अपघात झाल्यावर रस्ता दुरुस्त होणार?’

पालिका मुख्यालयातील शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयाच्या आवारात काळे कपडे घालून लायगुडे यांचे सलग पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यानंतर त्यांनी आज नेहमीचे पांढरे कपडे घालून रक्षाबंधनही साजरे केले.

Dhayari Narhe Basic Facilities Protest
Pune Ganeshotsav Noise Pollution: ‘ध्वनिप्रदूषणासाठी केवळ गणेशोत्सवाला लक्ष्य करू नका’; धीरज घाटेंची समान नियमांची मागणी

महिला भगिनींनी त्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. लायगुडे यांच्या आंदोलनाला सिंहगड रोडसह शहरातील विशेषत: नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Dhayari Narhe Basic Facilities Protest
Pune Narcotics Action: घरातूनच ड्रग्जचा धंदा; गायकवाड बंधूंचा पर्दाफाश, २५ लाखांचे एमडी जप्त!

धायरी-नऱ्हे परिसरातील रस्ते, पाणी, डी.पी. रस्त्यांच्या कामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना नवीन बांधकामांना परवानगी देण्याच्या महापालिकेच्या धोरणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Dhayari Narhe Basic Facilities Protest
Engineering Direct Second Year Admission: डिप्लोमाधारकांना इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची कोंडी; ९० टक्के गुण असूनही नामांकित कॉलेजचे दरवाजे बंद!

लायगुडे यांनी प्रशासनाकडे डी.पी. रस्त्यांचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, तसेच ठोस कारवाई होईपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देताना प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news