Dhayari Flyover Crack: धायरी फाटा उड्डाणपुलाला भेग पडल्याची चर्चा; महापालिकेचा खुलासा, 'पूल पूर्णपणे सुरक्षित'

मुसळधार पावसानंतर सोशल मीडियावर अफवा; दिसणारी भेग ही तांत्रिक 'ज्वाइंट एक्सपांशन' असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
Dhayari Flyover Crack
Dhayari Flyover CrackPudhari
Published on
Updated on

पुणे: धायरी फाटा येथील 'आमदार रमेश वांजळे उड्डाणपुला'ला मोठी भेग पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने मंगळवारी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मात्र, महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि हा पुलाचा तांत्रिक सांधा (ज्वाइंट एक्सपांशन) असून पुलाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नाही, असा खुलासा महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दिला आहे.

Dhayari Flyover Crack
Pune Extortion Case: पुण्यात 50 कोटींच्या खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; कथित बिष्णोई टोळीशी संबंधित तिघे अटकेत

पुण्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसात धायरी फाटा उड्डाणपुलावर रस्त्याला आणि कठड्याला जोडणाऱ्या भागात एक मोठी भेग नागरिकांच्या निदर्शनास आली. शिवसेनेचे विभागप्रमुख महेश पोकळे यांनी या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मंगळवारी सकाळीच महापालिकेचे उच्चाधिकारी, संबंधित ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागार (कन्सल्टंट) यांनी पुलाची सविस्तर पाहणी केली.

Dhayari Flyover Crack
Pune Rain Waterlogging: पुण्यात पावसाळी नियोजनावर मुरलीधर मोहोळ संतप्त; पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर महापालिकेला धारेवर धरले

हा पूल ज्या ठिकाणी बांधला आहे, तिथे मोठा कालवा आणि छोटा कालवा असे दोन कालवे वाहतात. दोन्ही कालवे एका पातळीत नसल्यामुळे पुलाचे बांधकाम करताना तिथे 'तिरपे गर्डर' टाकावे लागले आहेत. त्यावर लोखंडी प्लेट, सिमेंट काँक्रीट आणि त्यावर डांबराचा थर दिला आहे.

Dhayari Flyover Crack
Alandi Wari 2026: आळंदीत पावसातही भक्तिरसाचा जल्लोष; हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या फुगड्यांनी रंगली वारी

या पुलाला १५ वर्षे पूर्ण झाली असून, दोन गर्डरच्या सांध्यामध्ये पुलाचा अवजड वाहनांमुळे येणारा ताण आणि विस्तार सहन करण्यासाठी 'ज्वाइंट एक्सपांशन' साठी जागा सोडलेली असते. पूर्वी या जागेवर डांबराचा थर असल्याने ही भेग दिसत नव्हती. परंतु, सततचा पाऊस आणि अवजड वाहनांमुळे डांबराचा थर उखडल्याने ही भेग उघडी पडली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट करत पुलाला कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dhayari Flyover Crack
Pune Flood Update: पुण्यात 24 तासांत 121 मिमी पाऊस; 1,100 हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

हा उड्डाणपुलाचा तांत्रिक सांधा असून, तो बांधकाम करताना मुद्दाम रिकामा ठेवला जातो. केवळ त्यावरील डांबराचा थर निघाल्यामुळे ही भेग दिसत आहे. उड्डाणपुलाला आणि त्याच्या रचनेला कोणताही धोका नाही. या सांध्याची दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम महापालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे.

दिनकर गोजारे, प्रमुख, प्रकल्प विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news