Pune Municipal Voting: धनकवडी–सहकारनगरमध्ये 53.21 टक्के मतदान; मतदारांचा सकाळ-संध्याकाळी उत्साह

प्रभाग 36, 37 आणि 38 मध्ये शांततेत मतदान; 362 केंद्रांवर प्रक्रिया सुरळीत
Pune Municipal Voting
Pune Municipal VotingPudhari
Published on
Updated on

पुणे: धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये मतदारांनी गुरुवारी आपला हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या भागात सरासरी 53.21 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली.

Pune Municipal Voting
PMC Election 2026 Result Live Update: पुण्यात मोठी उलथापालथ, आबा बागुल यांचा पराभव

सकाळच्या सत्रात मॉकपोलदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. प्रभाग 36, 37 आणि 38 मधील 362 मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी 2 हजार 100 कर्मचाऱ्यांचे मोठे मनुष्यबळ तैनात केले होते. प्रशासनाने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली व्हीलचेअर व असिस्टंटची व्यवस्था केली होती. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा भणगे यांच्या अखत्यारित पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांनी दाखवलेला उत्साह दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. म्हणजेच सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होताच पहिल्या काही तासांत मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. ऊन वाढण्यापूर्वीच आपले मत नोंदवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाची लगबग पाहायला मिळाली. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली, तसतसे मतदार घराबाहेर पडले. यामुळे बहुतांश केंद्रांवर सायंकाळी पुन्हा एकदा गर्दीचा ओघ वाढला, हा ओघ रात्री मतदानाची वेळ संपेपर्यंत दिसत होता.

Pune Municipal Voting
Pune IT Tower: खराडीत 11 लाख चौरस फुटांचा एएए आयटी टॉवर केपेल लँडकडे सुपूर्द

धनकवडी- सहकारनगर भागात दुपारच्या सुमारास मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला असला, तरी सकाळी आणि सायंकाळच्या वाढत्या गर्दीने मतदानाचा टक्का उंचावण्यास मदत झाली. प्रशासनानेही वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक मतदान केंद्राच्या खोलीबाहेर पोलिस बंदोबस्त पहायला मिळत होता. याशिवाय स्लिपवाटप स्टॉल्सवर स्लिपा मिळवण्यासाठी मतदारांची गर्दी दिसत होती, ही गर्दी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास दिसली. मतदान केंद्रांच्या बाहेर लावलेले स्लिपवाटप स्टॉल आणि बेशिस्त पार्किंगमुळे धनकवडी-सहकारनगर या परिसरात काही ठिकाणी वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

Pune Municipal Voting
Prashant Jagtap PMC Election Result| राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या हायव्होल्टेज लढतीत प्रशांत जगताप यांचा दणदणीत विजय

कोळेवाडी भागात आदर्श मतदान केंद्र

प्रभाग 38 अंतर्गत कोळेवाडी या दुर्गम भागात पुणे महापालिका निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडले. या गावाचा 2021 मध्ये पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर स्थानिक ग््राामस्थांनी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. यानिमित्ताने महापालिकेच्या स्थानिक शाळेचे रूपांतर आदर्श मतदान केंद्रात करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर व सुरेखा भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विशेष जनजागृती करण्यात आली होती. प्रशासनाच्या प्रयत्नांतून तीनशेहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तृतीयपंथीयांचे मतदान

धनकवडी-सहकारनगर सहायक आयुक्त कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा भणगे यांनी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सीवायडीए संस्थेच्या मदतीने मतदार याद्यांतील 34 तृतीयपंथीय मतदारांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर बहुसंख्य तृतीयपंथीयांनी मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती करमरकर यांनी दिली.

Pune Municipal Voting
Pune Jilha Parishad Election: पुणे जिल्हा परिषद निवडणूक: अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

प्रभागनिहाय चित्र....

प्रभाग क्र. 36, 37 आणि 38 मध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यामध्ये प्रभाग 36 मध्ये सर्वाधिक 54.6 टक्के मतदान झाले, तर प्रभाग 38 मध्ये 54.1 टक्के आणि प्रभाग 37 मध्ये 49.9 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. प्रभाग क्रमांक 36 मध्ये 44 हजार 264 मतदान झाले, प्रभाग क्र. 37 मध्ये 37 हजार 427 मतदान झाले तर प्रभाग क्र. 38 मध्ये 79 हजार 826 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 3 हजार 539 पात्र मतदारांपैकी 1 लाख 61 हजार 517 मतदारांनी ईव्हीएम मशिनद्वारे आपले मत नोंदवले असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

तीन ‌‘ईव्हीएम‌’मध्ये बिघाड

सकाळच्या सत्रात ईव्हीएममध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. मॉकपॉल दरम्यान या तीन मशिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याचे समोर आले. मात्र, प्रशासनाने तत्परता दाखवत या मशीन बदलल्यामुळे मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर म्हणाल्या की, सकाळी मॉकपॉलच्या वेळी 3 मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. एरर लिंक, कनेक्शनमध्ये समस्या होत्या. त्या त्वरित बदलून आम्ही मतदान प्रक्रिया खंडित होऊ दिली नाही. 2,100 कर्मचाऱ्यांच्या मदतीने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व 362 केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news