Prashant Jagtap PMC Election Result| राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या हायव्होल्टेज लढतीत प्रशांत जगताप यांचा दणदणीत विजय

भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव, पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस उघडले खाते
Prashant Jagtap PMC Election Result| राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या हायव्होल्टेज लढतीत प्रशांत जगताप यांचा दणदणीत विजय
Published on
Updated on
Summary

वानवडी भागात प्रशांत जगताप यांचे वर्चस्व आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते वानवडी भागातून निवडून येतात. परंतु दोन्ही राष्ट्रवादी जवळ येत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक ही बहुचर्चित ठरली होती.

PMC Election Result Prashant Jagtap win

पुणे : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने खाते उघडले आहे. काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

पुण्यातील बहुचर्चित प्रभागाच्या निकालाकडे होते सर्वांचे लक्ष

पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 ड मधील ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली होती. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजीत शिवरकर यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्‍यक्ष असणार्‍यांना प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता.

Prashant Jagtap PMC Election Result| राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या हायव्होल्टेज लढतीत प्रशांत जगताप यांचा दणदणीत विजय
PMC Election 2026 Result Live Update: पुण्यात मोठी उलथापालथ, आबा बागुल यांचा पराभव

राष्‍ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश

प्रशांत जगताप यांचे वानवडी भागात वर्चस्व आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते वानवडी भागातून निवडून येतात. परंतु दोन्ही राष्ट्रवादींची महानगरपालिका निवडणुकीपूर्वी युती झाली. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रशांत पवार यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. अखेर या बहुचर्चित निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी बाजी मारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news