Transport Plan: गतिमान वाहतुकीसाठी 1 लाख 30 हजार कोटींची योजना: फडणवीस

पहिल्या टप्प्यात 62 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार
Transport Plan
गतिमान वाहतुकीसाठी 1 लाख 30 हजार कोटींची योजना: फडणवीस(file photo)
Published on
Updated on

Fadnavis transport infrastructure plan

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड सर्वंकष गतिशीलता योजनेअंतर्गत पुढील तीस वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्यानुसार एक लाख 30 हजार कोटी रुपयांची योजना हाती घेण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात 62 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महामेट्रोच्या वतीने आयोजित ‘पुणे शहर सर्वंकष गतिशीलता’ योजनेसंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. त्या वेळी फडणवीस बोलत होते. (Latest Pune News)

Transport Plan
Ajit Pawar News: चहल... मला ते परत सांगायला लावू नका! अजित पवारांनी अपर मुख्य सचिवांना स्टेजवरच सुनावले

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य

सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रधान सचिव अश्विनी भिडे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर या वेळीउपस्थित होते.

‘गतिशीलता योजना 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची असून, पहिल्या टप्प्यात 62 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूक 30 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल. महानगरांमध्ये सरासरी वेगमर्यादा तीस किलोमीटर पर्यंत होईल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘पुणे विभागात ही योजना तीस वर्षांत पूर्ण होणार आहे. बोगदे, समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) या अंतर्गत केले जाणार असून, गतिमान वाहतुकीशी ते संलग्नकेले जातील. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत पुढील दोन वर्षांत सहा हजार गाड्या घेण्याचे नियोजित आहे,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.

Transport Plan
5 New Police Stations: शहरात होणार नवीन पाच पोलिस ठाणी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

हडपसर ते लोणी-काळभोर मेट्रो मार्गिका

पुणे शहर सर्वंकष गतिशीलता योजना आराखड्यात हडपसर ते लोणी-काळभोर मेट्रो मार्गिंका प्रस्तावित आहे. शहराची वाढती लोकसंख्या, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता लोणी-काळभोरऐवजी हडपसर ते उरुळी कांचन मेट्रो मार्गिका असा बदल करण्याबाबत विचार करावा. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे वाढते नागरीकरण आणि त्यानुसार लागणार्‍या पाणीपुरवठ्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news