.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ajit Pawar scolds officer on stage
पुणे: गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर कार्यक्रमात चांगलेच सुनावले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी पवार बोलत होते.
पवार म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बंडगार्डन पोलिस ठाण्याची इमारत हलविण्याबाबतचा आदेश निघाला आहे. याबाबत मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत. तरी ते काम अजून झाले नाही. तेव्हा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, माझ्याकडून फाईल वर गेली आहे. वर म्हणजे चहल यांच्याकडे गेली आहे. चहल, मला ते परत सांगायला लावू नका. (Latest Pune News)
हिंजवडीतील रस्तारुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. तेव्हा लोक म्हणाले, तुम्ही इतरांची बांधकामे काढता. पण, पुलाच्या पुढे गेल्यावर औंधमधील पोलिसांच्या दोन इमारती अजून तशाच आहेत. कितीतरी दिवस झाले. अजून जरा कामातून वेळ काढा, त्याला मान्यता द्या. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल. आम्ही जी कामे सांगतो, ती सार्वजनिक कामे सांगतो. वैयक्तिक कामेसांगत नाही.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीकडे पवार यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी येणार्या अडचणीत पोलिस खात्याच्या वास्तूबद्दल पवार यांनी भर कार्यक्रमात स्टेजवरून उपस्थित असलेल्या चहल यांना फैलावर घेतले.