Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 18 जूनला प्रस्थान; 'या' दिवशी पुण्यात मुक्काम

देहू संस्थानने केला कार्यक्रम जाहीर
Pune News
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 18 जूनला प्रस्थान; 'या' दिवशी पुण्यात मुक्कामFile Photo
Published on
Updated on

देहूगाव: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 340 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या 18 जून रोजी श्रीक्षेत्र देहूगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी पालखी प्रस्थान आणि पालखी परतीच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर केली आहे.

...असा असेल प्रवास

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा बुधवार (दि. 18) देहूतील मुख्य मंदिरात होईल. याच ठिकाणी पालखी सोहळ्याची पहिली विश्रांती, दुसरी विश्रांती, दुपारचा मुक्काम, तिसरी आणि चौथी विश्रांती करून सायंकाळी तीन ते चार वाजताच्या दरम्यान लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घेऊन प्रस्थान ठेवणार आहे. सायंकाळी हा पालखी सोहळा श्री संत तुकाराम महाराजांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात मुक्कामी राहील. (Latest Pune News)

Pune News
Water Crisis: खेडमधील 17 गावांत 9 टँकरने पाणीपुरवठा; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

गुरुवार (दि. 19) रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी दहा वाजताच्या सुमारास इनामदारसाहेब वाड्यातून पुढील वाटचाल करील. अनगडशहा बाबा दर्गा या ठिकणी पहिल्या विश्रांतीत अभंग आरती घेऊन दुपारी चिंचोली येथील श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिरात येईल. त्या ठिकणी दुपारची विश्रांती घेऊन अभंग आरती झाल्यानंतर पालखी सोहळा आकुर्डी येथील मुक्कासाठी निघेल, देहूरोड येथून पालखी सोहळा निगडीमार्गे आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहील.

शुक्रवार (दि. 20) रोजी आकुर्डीचा मुक्काम होऊन पिंपरी एच. ए. कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिली विश्रांती घेऊन कासारवाडीत दुसरी विश्रांती आणि दापोडीतील तिसरी विश्रांती घेऊन शिवाजीनगर, चौथी विश्रांती संत तुकाराम महाराज पादुका फर्ग्युसन रोड येथे घेऊन नाना पेठमधील श्री निवडुंग विठ्ठल मंदिरात तिसर्‍या मुक्कामासाठी विसवणार आहे.

Pune News
Leopard Attack: अकरा महिन्याच्या मुलाला आई समोरून बिबट्याने उचलून नेले...

सोमवार (दि. 23) लोणी काळभोर कदम वाकवस्ती, नवीन पालखी स्थळावरून सकाळी पालखी सोहळा निघेल. कुंजीरवाडी पहिली विश्रांती, शिंदवणे चौक पी.डी.सी.सी बँकसमोर सोलापूररोड येथे दुसरी विश्रांती घेऊन जावजीबुवावाडी येथे तिसरी विश्रांती घेऊन हा पालखी सोहळा यवत येथील पालखीतळ श्री भैरवनाथ मंदिरात मुक्कामी राहणार आहे.

मंगळवार (दि. 24) रोजी सकाळी यवत श्री भैरवनाथ मंदिरातून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढील वाटचाल करणार आहे. भांडगाव येथील दुपारचा मुक्काम करून केडगाव चौफुला येथील तिसरी विश्रांती करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात रात्रीचा मुक्काम करणार आहे.

बुधवार (दि. 25) रोजी सकाळी वरवंड विठ्ठल मंदिरातून पालखी सोहळा निघून भागवत वस्ती येथे पहिली विश्रांती, पाट्स येथील नागेश्वर मंदिरात दुपारचा विसावा घेऊन पालखी सोहळा उंडवडी गवळ्याची येथील पालखी तळावर मुक्कामी राहणार आहे.

गुरुवार (दि. 26) जूनला उंडवडी पठार येथे पहिली विश्रांती, बर्‍हाणपूर फाटा येथील दुपारचा मुक्काम करून मोरेवाडी येथील तिसरी आणि सराफ पेट्रोल पंप येथील चौथी विश्रांती घेऊन पालखी सोहळा बारामती येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामास राहील.

शुक्रवार (दि. 27) जून रोजी बारामती येथून सकाळी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निघेल. मोतीबाग येथे पहिली विश्रांती व 1) पिंपळी ग्रेप, 2) लिमटेकची दुसरी तर काटेवाडी येथील दुपारचा मुक्काम करून पालखी सोहळा, भवानीनगर साखर कारखाना येथील तिसर्‍या विश्रांतीनंतर सणसर येथील पालखी तळावर पालखी सोहळा रात्रीच्या मुक्कामी असेल.

शनिवार (दि. 28) जून रोजी सकाळी हा पालखी सोहळा सणसर, पालखी तळावरून मार्गस्थ झाल्यावर बेलवाडी येथे पहिल्या विश्रांतीत गोल रिंगण होऊन दुपारची विश्रांती बेलवाडीत होणार आहे. त्यानंतर लासुरणे जंक्शन, आंथुरणे शेळगाव येथील तिसरी विश्रांती आणि गोतंडीच्या चौथ्या विश्रांतीनंतर निमगाव केतकी पालखी तळावर पालखी सोहळा रात्रीच्या मुक्कामी असेल.

रविवार (दि. 29) जून रोजी सकाळी निमगाव केतकी पालखी तळावरून पालखी सोहळा निघाल्यानंतर तरंगवाडी ओढा येथील दुसरी विश्रांती घेऊन पालखी सोहळा इंदापूर येथे दुपारची विश्रांती घेईल आणि याच ठिकाणी दुपारचे गोल रिंगण होईल. त्यानंतर पालखी सोहळा इंदापूर येथेच पालखी तळावर मुक्कामी असेल.

सोमवार (दि. 30) जून रोजी सकाळी इंदापूर पालखीतळ येथून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर गोकुळीचा ओढा पहिली विश्रांती, वडापुरी सूरवड येथील दुसरी विश्रांती घेऊन बावडा येथे दुपारचा मुक्काम करून सराटीच्या पालखी तळावर मुक्काम करणार आहे.

मंगळवार (दि. 1) जुलै रोजी श्री. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी पालखी तळ या ठिकाणी नीरा स्नान करून मार्गस्थ होईल. अकलुज माने वि. येथील पहिल्या विश्रांतीत गोल रिंगण होऊन हा पालखी सोहळा अकलूज माने वि. या ठिकाणीच दुपारचा मुक्काम करणार आहे. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामी अकलूज माने. वि. येथे असेल.

बुधवार (दि. 2) जुलै रोजी अकलूज माने वि. येथून हा पालखी सोहळा निघणार आहे. माळीनगर येथील पहिल्या विश्रांतीत, उभे गोल रिंगण होऊन, याच ठिकाणी दुपारचा मुक्काम करून, पायरीचा पूल येथे तिसरी आणि कदम वस्ती, श्रीपूर साखर कारखाना चौथी विश्रांती घेऊन हा पालखी सोहळा बोरगाव श्रीपूर येथे मुक्काम असेल.

गुरुवार (दि. 3) जुलै रोजी सकाळी बोरगाव श्रीपूर येथून पालखी सोहळा निघाल्यानंतर, माळखांबी येथे दुपारची विश्रांती घेऊन तिसरी विश्रांती तोंडले-बोंडले धावा आणि टप्पा येथील चौथी विश्रांती करून पालखी सोहळा पिराची कुरोली गायरान पालखी तळावर मुक्कामास असेल.

शुक्रवार (दि. 4) जुलै रोजी पालखी सोहळा पिराची कुरोली येथून सकाळी मार्गस्थ होऊन याच ठिकाणी दुपारचा मुक्काम करून भांघड वस्ती शेगाव येथील तिसरी विश्रांती घेऊन पुढे बाजीराव विहीर या ठिकाणी चौथ्या विश्रांतीत उभे गोल रिंगण होऊन हा पालखी सोहळा वाखरी येथील पालखी तळावर मुक्कामी असेल.

शनिवार (दि. 5) जुलै रोजी वाखरी येथेच पादुका आरती व उभे रिंगण होईल, त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर, श्री संत तुकाराम महाराज मंदिर, नव्या इमारतीत रात्रीच्या मुक्कामी पोहचेल.

रविवार (दि. 6) जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान (मंदिर) नगर प्रदक्षिणा रोड, नवीन इमारत येथे सोहळा मुक्कामी असेल.

एकादशी बुधवार (दि. 9) जुलै ते गुरुवार (दि. 10) रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत तुकाराम महाराज संस्थान (मंदिर, नवीन इमारत) प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर येथे राहील. दुपारनंतर पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघेल.

21 जून रोजी पुण्यात मुक्काम

शनिवार (दि. 21) रोजी नाना पेठ, श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरातच पालखी सोहळा मुक्कामी राहील. रविवार (दि. 22) रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होईल. नंतर भैरोबानाला येथील पहिली विश्रांती घेऊन हसपसर येथे दुपारची विश्रांती करून मांजरी फार्मची तिसरी आणि लोणी काळभोर रेल्वे स्टेशन येथील चौथ्या विश्रांतीनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर येथे कदम वाकवस्ती, नवीन पालखी स्थळावर मुक्कामी राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news