औंध आयटीआयमध्ये जवळपास 33 ट्रेड आहेत. यातील अनेक ट्रेडच्या विद्यार्थ्यांना परदेशात मागणी आहे. संबंधित ट्रेडच्या माध्यमातून भारतापेक्षाही परदेशात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा.– आर.बी.भावसार, उपसंचालक, आयटीआय, औंधयुरोपात सध्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाप्रचंड मागणी आहे. युरोपात सध्या तरुण वर्ग कमी आहे. तर, भारतात तो सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळतील.– पी.एस.वाघ, आंतरराष्ट्रीय आयटीआय समुपदेशक