पुणे : आखाडामुळे मासळी, चिकनला मागणी

पुणे : आखाडामुळे मासळी, चिकनला मागणी
Published on
Updated on

पुणे : आखाडामुळे बाजारात मासळी, चिकन व मटणाला मागणी वाढली आहे. आखाडाच्या पार्श्वभूमीवर बाजाराच कोंबड्या मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यातुलनेत मागणी कमी पडल्याने चिकनचे भाव किलोमागे दहा रुपयांनी उतरले आहेत. मटण, गावरान व इंग्लिश अंडीचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदीचा काळ संपला आहे. मात्र, अद्याप येथून आवक सुरू झालेली नाही. सध्यस्थिती पूर्व किनारपट्टी असलेल्या हावडा, ओरीसा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या भागातून मोठ्या प्रमाणात मासळी बाजारात दाखल होत आहे. मासळीला मागणीही मोठी आहे. मात्र, त्यातुलनेत आवक जास्त असल्याने मासळीच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 2) खोल समुद्रातील मासळीची 15 ते 12 टन, खाडी 100 ते 200 किलो, नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1200-1500, मोठे : 900-1000, मध्यम : 700-800, लहान : 600-700, भिला : 600-700, हलवा : 800-900, सुरमई : 800-1200, रावस : 600-1000, घोळ : 700-800, करली : 360-400, करंदी : 200, पाला : 1500-1600, वाम : 600-700, ओले बोंबील : 200-280. कोळंबी : लहान 200-280, मोठी : 500-600, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1400-1500, मोरी : 250-400, मांदेली : 150-180, खेकडे : 280-320, चिंबोर्‍या : 480-550. तांबोशी : 440-480, पालू : 280-320, लेपा : 240-280, बांगडा : लहान 200 मोठा 240, शेवटे : 280-320, तिसर्‍या : 240, खुबे : 140, तारली : 160-180. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 360-400, शिवडा : 160-200, खवली : 160-200, आम्ळी : 120-140, खेकडे : 200-400, वाम : 550. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 230, लेगपीस : 290, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 605, डझन 84, प्रतिनग 7.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news