श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा सजले 21 हजार सूर्यफुलांच्या राशीत !!

श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा सजले 21 हजार सूर्यफुलांच्या राशीत !!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. तसेच मंदिराच्या कळसापासून ते गाभार्‍यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पहिल्यांदाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली. डॉ. जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले.

सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर 7-8 दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news