Vighnahar Sugar Factory: ‘विघ्नहर’चे 2025-26 चे ऊस लागवड धोरण जाहीर

1 जूनपासून आडसाली लागवडीसाठी बेणेपुरवठा सुरू
Vighnahar sugar factory
‘विघ्नहर’चे 2025-26 चे ऊस लागवड धोरण जाहीरFile Photo
Published on
Updated on

नारायणगाव: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने लागवड हंगाम 2026-27 साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याकरिता लागवड हंगाम सन 2025-26 मध्ये ऊस लागवडीचे धोरण 1 जूनपासून सुरू करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

ऊस लागवड धोरणाबाबत शेरकर यांनी सांगितले की, आडसाली ऊस लागवडीसाठी 1 जून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये को. 86032, को. एम. 0265, पीडीएन 15012, कोव्हीएसआय 18121, पीडीएन 11082, पीडीएन 15006 व पीडीएन 13007 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.  (Latest Pune News)

Vighnahar sugar factory
Manchar Market Update: मंचरला तरकारीची आवक वाढली; दर कडाडले

पूर्वहंगामी लागवडीसाठी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामध्ये को. 86032, को.एम.0265, पीडीएन 15012, कोव्हीएसआय 18121, पीडीएन 11082, पीडीएन 15006, पीडीएन 13007, को 9057 आणि व्हीएसआय 08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी आहे.

सुरु हंगामासाठी 1 डिसेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत को. 86032, को.एम. 0265, पीडीएन 15012, कोव्हीएसआय 18121, पीडीएन 11082, पीडीएन 15006, पीडीएन 13007, को 9057 व व्हीएसआय 08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.

त्यातील डिसेंबर महिन्यात कोएम 0265 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सर्व सभासद व ऊस उत्पादकांना 1 जून 2025 पासून वरीलप्रमाणे उपलब्धतेनुसार वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांना प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन

कारखाना कार्यक्षेत्रात गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा म्हणून कारखान्यामार्फत ऊस विकास अभियान प्रमाणावर राबविले जात असून, त्याअंतर्गत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मागणीनुसार उधारी तत्त्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जातो. ऊस लागवड व कारखान्याकडे नोंद झाल्यानंतर प्रतिएकरी ऊस उत्पादनवाढीसाठी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाते.

Vighnahar sugar factory
Pune: कचरा प्रकल्प बंद करा, स्वच्छ हवा मिळू द्या! सूस खिंड परिसरातील प्रकल्पाविरोधात नागरिकांचे आंदोलन

जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होऊन रासायनिक खतांची मात्रा कमी होण्यासाठी जीवाणू खतांचा पुरवठा केला जातो. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी हिरवळीचे खतासाठी ताग बियाणे यांचा पुरवठा केला जातो. पाणी व रासायनिक खतांची बचत करून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी कारखान्यामार्फत ठिबक सिंचन योजना राबविण्यात येत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news