CTET Exam Postponed: सीटीईटी परीक्षा पुढे ढकलली; उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

२५ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान नव्याने नोंदणी; परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर होणार
CTET
CTETPudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करता न आलेल्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

CTET
Maharashtra Atrocity Act Training: अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण; राज्यातील ५ हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

सीबीएसईने या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. सीबीएसईतर्फे २२ व्या सीटीईटीसाठी ११ मे ते १० जूनदरम्यान अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

CTET
Sugar Price Fall: साखरेच्या दरात मोठी घसरण; निविदांमध्ये क्विंटलमागे ५०० रुपयांची घट

मात्र, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पुरेशी संधी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या व्यापक हिताचा विचार करून प्रस्तावित सीटीईटीसाठी नोंदणी करू न शकलेल्या उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

CTET
Pune Cantonment FSI: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये दोन एफएसआयला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी; २,५०० मालमत्तांना दिलासा

या पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या नोंदणी प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news