E-scooter sales: ई-दुचाकी खरेदीत लाखाचा टप्पा पार; पुणे आरटीओ कार्यालयात नोंद

सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकींचीच खरेदी
E-scooter sales
ई-दुचाकी खरेदीत लाखाचा टप्पा पार; पुणे आरटीओ कार्यालयात नोंदPudhari
Published on
Updated on

पुणे: पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत पुणे शहराने इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली आहे. शहरातील ई-वाहनांनी 1 लाख वाहन खरेदीचा टप्पा पार केला असून, अतिरिक्त 19 हजार 100 ई-वाहनांची शहरात खरेदी झाली आहे. म्हणजेच सध्या पुण्यात तब्बल 1 लाख 19 हजार 100 इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावत आहेत.  (Latest Pune News)

E-scooter sales
Alcohol Testing: शालेय बसचालकांची आता मद्यपान व औषध चाचणी

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आरटीओ) यांच्याकडून ही नोंद करण्यात आली आहे. पूर्वी पुणे शहराची ओळख सायकलींचे शहर म्हणून होती. इंधनक्रांतीच्या काळात शहरात दुचाकींचीच पुण्यात सर्वाधिक खरेदी झाली.

ई-युगाला सुरुवात झाल्यानंतर इलेक्ट्रिक वाहने वाढत असून आता ई-वाहनांनी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तसेच पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरुकता यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे.

E-scooter sales
Bhushi Dam: पोहण्याचा मोह जीवावर बेतला! लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून दोन मित्रांचा अंत

पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या

वाहन प्रकार एकूण संख्या

दुचाकी/स्कूटर 1,05,948

मोटार कार 9,038

तीनचाकी (मालवाहू) 1,141

बस 634

ई-रिक्षा (मालवाहू) 530

तीनचाकी (प्रवासी) 314

मालवाहतूक वाहने 274

मोटर कॅब 1,044

मोपेड 78

ई-रिक्षा (प्रवासी) 78

इतर 45

एकूण 1,19,100

इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

  • शून्य उत्सर्जन असल्यामुळे पर्यावरणपूरक

  • पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत चालवण्यासाठी कमी खर्च येतो

  • इलेक्ट्रिक वाहनामुळे ध्वनिप्रदूषण कमी होते

  • खरेदीवर सरकारकडून सबसिडी आणि कर सवलत

पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारा प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. 1 लाख 19 हजारांचा आकडा हा केवळ एक टप्पा आहे. भविष्यात ही संख्या आणखी वेगाने वाढेल, असा विश्वास आहे. सरकार आणि आरटीओ विभाग इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा वाढवणे, जनजागृती करणे आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यावर आमचे लक्ष असेल. प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा उत्तम पर्याय आहे.

- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news